Home » Blog » Koratkar released : कोरटकरची कारागृहातून सुटका

Koratkar released : कोरटकरची कारागृहातून सुटका

काळ्या फिल्मिंगच्या कारमधून कोरटकर कोल्हापूरबाहेर रवाना

by प्रतिनिधी
0 comments
Koratkar released

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका झाली. कळंबा कारागृहातून उजळाईवाडी विमानतळ या मार्गावरील कोरटकरच्या प्रवासासाठी पोलिसांनी काळ्या फिल्मिंगचा कारचा वापर केल्याने पोलिस प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. दुपारी पावनेतीन वाजता कोरकटर विमानाने मुंबईकडे रवाना झाला. त्यानंतर कोरटकर नागपूरला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोरटकरचा ११ दिवस कारागृहात मुक्काम होता. (Koratkar released)

बुधवारी (दि.९) जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच पोलिस ज्यावेळी बोलवतील त्यावेळी पोलिस ठाण्यात हजर राहण्याची अटही घालण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी जामिनाची पन्नास हजार रुपये भरल्यानंतर कळंबा कारागृहातून रात्री सुटका होत नसल्याने कोरटकरचा कारागृहातील मुक्काम वाढला. काल गुरुवारी महावीर जयंतीची सुट्टी असल्याने कारागृहातून सुटका झाली नाही. आज शुक्रवारी दुपारी सव्वा दोन वाजता सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यावर सुटका झाली. (Koratkar released)

कळंबा कारागृहातून सुटका होणार असल्याने परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरटकरवर यापूर्वी हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने कारागृहाचा आवारात कुणालाही सोडले जात नव्हते. दोन वाजता सांगली पासिंगची पांढऱ्या रंगाच्या कारला कळंबा कारागृहात मुख्य दरवाजात लावण्यात आली. या कारच्या काचा काळ्या फिल्मिंगच्या होत्या. कोरटकर कळंबा कारागृहात बाहेर पडताच त्याला कारमध्ये बसवण्यात आले. कडेकोट बंदोबस्तात कार उजळाईवाडी विमानतळाकडे रवाना झाली. दुपारी पावनेतीन वाजता विमानाने तो मुंबईला रवाना झाला. (Koratkar released)

कोरटकरला २४ मार्च रोजी अटक झाली होती. न्यायालयाने त्याला पहिल्यांदा तीन दिवसाची त्यानंतर दोन दिवसाची पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. सुरक्षिततेच्यादृष्टीने कोरटकरला कळंबा मध्यवर्ती कार्यालयात ठेवण्यात आले होते. बुधवारी त्याला जामिन मिळाला. आज शुक्रवारी त्याची सुटका झाली. (Koratkar released)

दरम्यान काचेवर काळी फिल्म लावण्याची बंदी असताना आणि सुरक्षेच्या नियमांना फाटा देऊन पोलिसांनी या कारला कारागृहाच्या आवारात कसा प्रवेश दिला? असा प्रश्न प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी केला. या कारवर पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. (Koratkar released)

हेही वाचा :

बंदुकीच्या धाकावर कधीही वाटाघाटी करणार नाही

 राणाला बिहार निवडणुकीपूर्वी फाशी देतील

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00