Home » Blog » Koratkar interrogaion : कोरटकरला मदत करणाऱ्यांची चौकशी होणार  

Koratkar interrogaion : कोरटकरला मदत करणाऱ्यांची चौकशी होणार  

by प्रतिनिधी
0 comments
Koratkar interrogaion

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने आणखी दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिसांनी न्यायालयाकडे पाच दिवस पोलिस कोठडीची मागणी केली होती. यापूर्वी त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती.  चौकशीत कोरटकरला मदत करणाऱ्यांची नावे उघड झाली असून पोलिस त्यांच्याकडे चौकशी करणार आहेत. (Koratkar interrogaion)

प्रथम वर्ग न्यायदंडाधकारी एस.एस.तट यांच्यासमोर सुनावणी झाली. पोलिसांनी न्यायालयाला तपासाची माहिती दिली. अधिक तपासासाठी सात दिवस पोलिस कोठडीची मागणी केली. सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांनी युक्तीवाद केला. पोलिसांच्या तपासात कोरटकरला मदत करणाऱ्याची नावे उघड झाली आहेत. कोरटकरांचा गंभीर गुन्हा असतानही त्यांनी मदत केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सरकारी वकील पोवार यांनी केली. कोरटकरला कोणत्या संघटनेने किंवा व्यक्तीने मदत केली आहे याचाही तपास करावा लागणार असल्याचे पोवार यांनी सांगितले. (Koratkar interrogaion)

कोरटकर एकटेच कमावणारे

कोरटकरांच्यावतीने सौरभ घाग यांनी युक्तीवाद केला. कोरटकरांनी जातीय तेढ निर्माण केली असे नेहमीच सांगितले जाते. पण तो ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप कुणी व्हायरल केली?  त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये मी हे संभाषण व्हायरल करतो असे म्हटंले आहे. फोन कॉल व्हायरल झाला. त्याचवेळी कोरटकर यांनी नागपूर पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिस चौकशी करत होते. कोरटकर एक पत्रकार आहेत. त्यांचे एक चॅनेल आहे. घरामध्ये ते एकटेच कमावणारे आहेत असा युक्तीवाद वकील घाग यांनी केला. त्यांच्या या युक्तीवादाला इतिहास अभ्यास इंद्रजीत सावंत यांचे वकील असिम सरोदे यांनी आक्षेप घेतला. दोन्ही वकिलांमध्ये खडाजंगी झाली. (Koratkar interrogaion)

दोन्हीकडील युक्तीवाद झाल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तट यांनी कोरटकरला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर त्यांना रविवारी ३० रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. (Koratkar interrogaion)

कोरटकरला यांनी मदत केली.

कोरटकरला पसार होण्याच्या काळात मदत केलेल्यांची नावे पोलिसांनी न्यायालयात सांगितली. कोरटकरने धीरज चौधरी यांच्या वाहनाचा वापर केला होता. एकूण चार वाहने वापरली होती. त्यापैकी एक वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच त्याला प्रशिक पडवेकर (रा.नागपूर), धीरज चौधरी (रा. चंद्रपूर), हिमायत अली (रा. इंदोर, मध्यप्रदेश), राजेंद्र जोशी (रा. इंदोर), साईराज पेटकर (रा. करीमनगर) यांनी मदत केली होती. कोरटकरला मदत करणाऱ्यांची पोलिस चौकशी करणार आहेत. (Koratkar interrogaion)

जयदीप शेळकेंना ताब्यात घेतले

सुरक्षेच्या कारणावरुन पोलिसांनी कोरटकरला आज शुक्रवारी सकाळी आठ वाजता न्यायालयात आणले होते. ज्यावेळी त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले होते त्यावेळी त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. बुधवारी हल्ला करणारे जयदीप शेळके आजही कोर्टात आले होते. आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेळके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्यांचा शर्टही फाटला. (Koratkar interrogaion)

हेही वाचा :

कोरटकरवर कोर्टात हल्ला

न्यायालयाकडून इम्रान प्रतापगढी विरोधातील एफआयआर रद्द

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00