कोल्हापूर : प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्यात नवे पारगाव येथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला गेला. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले, चौकशीही सुरू केली. शवविच्छेदन केले असता तो खून नव्हे तर त्या व्यक्तीचा मृत्यू वीज पडून झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी याबाबतची माहिती दिली. नवे पारंगाव येथे नितीन मानसिंग भोसले (वय वर्षे ३०, रा. फडनायक कॉलनी, वारणानगर, रा. – मोहरे, तालुका- पन्हाळा) या तरुणाचा आज (दि.१) सकाळी नवे पारगाव येथे मोटरसायकलसह मृतदेह सापडला. प्रथमदर्शनी हा खून असावा, अशी शंका आल्याने वडगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांनी समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान काही व्यक्तींनाही ताब्यात घेतले. दरम्यान नितीन भोसलेचा मृतदेह विच्छेदनासाठी नवे पारगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदन केले असता नितीनलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. तसेच मृताच्या अंगावर भाजल्याच्या तसेच फुफ्फुसही जळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा :
- कोल्हापूरच्या दसरा महोत्सवात यंदा शिव- शाहूंच्या हस्ताक्षरातील दुर्मिळ पत्रसंग्रह
- श्री अंबाबाई मंदिर परिसरात यंदा ‘एआय’ वॉच
- कोल्हापुरी फेटा, धोतर…शिक्षण आणि महोत्सव !