Home » Blog » रश्मी शुक्लांना हटवा; काँग्रेस शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी

रश्मी शुक्लांना हटवा; काँग्रेस शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी

काँग्रेस शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी

by प्रतिनिधी
0 comments
Maharashtra Politics

मुंबई : प्रतिनिधी, विधानसभेच्या आगामी निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी वादग्रस्त आणि सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत. (Maharashtra Politics) राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची कारकीर्द संशयास्पद आणि वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यासारखे प्रकार त्यांनी केले आहेत. त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यामुळे निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्षपातीपणे पार पडण्यासाठी शुक्ला यांना हटवावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली.

वादग्रस्त आणि सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही हटवावे

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम आणि डॉ. गजानन देसाई यांचा समावेश होता. शुक्ला यांच्यासह वादग्रस्त आणि सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनाही हटवावे, अशी मागणी आम्ही आयोगाकडे केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, ‘‘ शुक्ला यांची सेवा समाप्त झाली असतानाही भाजप-युती सरकारने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. सरकारला अनुकूल भूमिका घेऊन त्या मदत करतात. असे वादग्रस्त व संशयास्पद अधिकारी निवडणूक काळात नसावेत अन्यथा निवडणूक निष्पक्ष होणार नाही, याकडे  निवडणूक आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. त्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.’’

महाराष्ट्रात कायदा–सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे : पटोले

महाराष्ट्रात कायदा–सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मंत्रालयातील गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची एका महिलेने तोडफोड केली. राज्याचे गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर जनता कशी सुरक्षित असेल, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. भाजपा युती सरकारने विकासाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे, विकास कुठेच दिसत नाही पण निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये सरकारची स्वच्छ व विकास केल्याची प्रतिमा मीडियातून दाखवण्यासाठी एका आयएएस अधिकाऱ्यामार्फत मीडियाच्या प्रमुख व्यक्तींना बोलावून टार्गेट दिले जात आहे. यासाठी एमएसआरडीसी, एमएमआरडीए, म्हाडा, सीडको, प्रदुषण महामंडळ, एसआरए यांचा पैसा वापरला जात आहे. राज्य सरकारच्या विविध महामंडळावर हजारो कोटींचे कर्ज आहे. महामंडळे ५० हजार कोटी रुपये तोट्यात आहेत हे कॅगच्या अहवालातून समोर आले आहे. सरकारकडे पैसे नसताना या महामंडळाचा पैसा वापरून कोट्यवधींची उधळपट्टी सुरु आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.

पावसामुळे राज्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या तीन चार दिवसांत ३३ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. शेतकरी संकटात आहे पण सरकारने अद्याप मदत दिलेली नाही. मुंबईतील नालेसफाईच्या कामात जातीने लक्ष घातल्याने मुंबई तुंबणार नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी एका कार्यक्रमात केला आणि संध्याकाळी झालेल्या पावसात मुंबई तुंबली, मुंबईचे जनजीवन ठप्प झाले. अवकाळी पावसासारखे भाजपा युती सरकारही अवकाळीच आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

Maharashtra Politics : खाजगी जागेतील मतदान केंद्र रद्द करा

यावेळी बोलताना काँग्रेस सरचिटणीस मुनाफ हकीम यांनी खासगी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र सुरु करण्याला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. मतदान हे सरकारी इमारतीतच झाले पाहिजेत. तसेच मतदानाची आकडेवारी देणारे 17 C फॉर्म मतदानानंतर लगेचच मतदान प्रतिनिधींना देण्यात यावेत, अशी भूमिकाही मांडल्याचे सांगितले.

हेही वाचा 

You may also like

error: Content is protected !!