Home » Blog » इराणचे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिव लारीजानी ठार झाल्याचा इस्त्रायलचा दावा

इराणचे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिव लारीजानी ठार झाल्याचा इस्त्रायलचा दावा

by प्रतिनिधी
0 comments
Israel claims Larijani killed

नवी दिल्ली : इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिव अली लारीजानी ठार झाल्याचा दावा इस्त्रायलच्या माध्यमांनी केला आहे. लारीजानी हे इराणच्या प्रशासनातील प्रमुख व्यक्ती मानले जातात. अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर अमेरिका इस्त्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात ते अग्रेसर होते. इस्त्रायलने लारीजानी ठार झाल्याचा दावा केला असला तरी इराणने याबाबत कोणताही खुलासा दिलेला नाही. (Israel claims Larijani killed)

लारीजानीबरोबर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचा प्रमुख बसिज दलाचा प्रमुख गुलाम रझा सालेमानी यांनाही ठार केल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. काल सोमवारी रात्री इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात दोन्ही नेत्यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. बीबीसीने लारीजानी ठार झाल्याचे वृत्त दिले आहे. (Israel claims Larijani killed)

इस्त्रायलचे सरंक्षण दलाचे चिफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल आयल झमीर यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यात पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचे अक्रम अल अजौरी यांच्यासह त्यांच्या गटाच्या सदस्यांना लक्ष केल्याचा संरक्षण सुत्रांनी हवाला दिला आहे. लारीजानी हे अयातुल्ला खामेनीचे यांचे विश्वासू साथीदार म्हणून ओळखले जातात. लारीजानी यांचा मृत्यू झाला असेल तर तो इराणला मोठा धक्का ठरलणार आहे. इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना अमेरिकेने १० मिलियन डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. (Israel claims Larijani killed)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00