Home » Blog » ईशानी हिंगेची ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सेशन ४’ साठी निवड

ईशानी हिंगेची ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सेशन ४’ साठी निवड

by प्रतिनिधी
0 comments
Ishani Hinge's selection

कोल्हापूर : मुळची कागलची आणि सध्या मुंबईत स्थायिक असलेली संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख कलावंत ईशानी अरविंद हिंगे हिची ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सेशन चार’ या शोसाठी निवड झाली आहे. या कार्यक्रमाचे प्रसारण तीन जानेवारीपासून रोज संध्याकाळी सुरु झाले आहे. (Ishani Hinge’s selection)

ईशानी गेली आठ वर्षे कला क्षेत्रात असून वयाच्या पाचव्या वर्षांपासून ती शास्त्रीय संगीत शिकत आहे. तिने विविध नाट्यसंगीत, अभंग, सुगमसंगीत, शास्त्रीय संगीत अशा गायन कला प्रकारांमधून पुणे, मुंबई, नाशिक, सूरत, जयपूर अशा ठिकाणी नावलौकिक कमावला आहे. आठ हजार विद्यार्थ्यांमधून चौदा मुला-मुलींची निवड करण्यात आली असून या स्पर्धेत ईशानीची निवड झाल्याने तिच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ईशानी हि फक्त गायनातच नव्हे तर अभिनयामध्येही कुशल आहे. तिने वेब सिरीज, मुव्हीज आणि नाटकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. तसेच तीने सुरत मध्ये इंडियाज टॉप मॉडेल ही पदवी पात्र केली आहे. तिला पंडित रघुनाथजी खंडाळकर, पद्मजा फेणानी- जोगळेकर, अपर्णा संत, अभिषेक मारोटकर याबरोबरच संग्राम संगीत विद्यालय यांचे मार्गदर्शन लाभले. (Ishani Hinge’s selection)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00