Home » Blog » Husain dalwai : महाराष्ट्रातील काँग्रेसचे संघटन अत्यंत खराब

Husain dalwai : महाराष्ट्रातील काँग्रेसचे संघटन अत्यंत खराब

माजी खासदार हुसेन दलवाईंचा काँग्रेसला घरचा आहेर

by प्रतिनिधी
0 comments
Husain dalwai

मुंबई : प्रतिनिधी : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळणार असल्याच अंदाज व्यक्त झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हुसेन दलवाई पक्षातील संघटनेतील समस्येवर बोट ठेवले आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसमध्ये संघटनेवर लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे संघटन अत्यंत खराब असल्याची टीका करत त्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. (Husain dalwai)

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधी यांनी केलेले भाषण जनतेला आवडले. जनता राहुल गांधी यांच्या समवेत आहे, असेही ते म्हणाले. हुसेन दलवाई यांनी, महाराष्ट्रात काँग्रेसचे संघटन आहे की नाही याची माहिती नाही. पण एक काळ असा होता महाराष्ट्रात काँग्रेसचे मजबूत संघटन होते. आज महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट आहे. वरिष्ठ नेतृत्वाने त्यावर लक्ष देण्याची गरज आहे. नेतृत्वाचे म्हणणे जे लोक ऐकत नाहीत त्यांना बाजूला करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. (Husain dalwai)

तिरुपती मंदिरात १६ गैर हिंदू कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे मतही हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले. इतके दिवस गैर हिंदू कर्मचारी काम करत होते तेव्हा काहीच अडचण निर्माण झाली नाही. आता ज्या पद्धतीने त्यांच्या बदल्या केल्या तो प्रकार चुकीचा आहे. (Husain dalwai)

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हिंदू समाजातील एकजुटतेच्या वक्तव्यावर हुसेन दलवाई म्हणाले, भागवत नेहमी हिंदू, हिंदू, हिंदू म्हणतात. ते आज एक बोलतात आणि काल वेगळेच बोलले असते. मी त्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की त्यांनी हिंदू समाजातील एकजुटतेबाबत सर्वप्रथम ब्राह्मणांना सांगितले पाहिजे. कारण ब्राह्मण समाज दुसऱ्या समाजांना सोबत घेऊन जाण्यास तयार नाही. समाजवादी नेते खासदार अखिलेश यादव हे काँग्रेसला सल्ला देण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्यांदा त्यांनी समाजवादींना शिकवण दिली पाहिजे आणि मग काँग्रेसला दिली पाहिजे, असा टोलाही त्यांनी मारला.

हेही वाचा :

…मग गुजरातचे लोक अमेरिकेत कसे?
शेख मुजीबुर रहमान यांचे निवासस्थान पेटवले

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00