Home » Blog » Hurry up for sowing :  शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

Hurry up for sowing :  शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

by प्रतिनिधी
0 comments
Hurry up for sowing

मुंबई : प्रतिनिधी :  यंदा मान्सूनचे आगमन लवकर झाले असले तरी २७ मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार आहे. तापमानात काही प्रमाणात वाढ होणार आहे. आपल्या भागात मान्सून लवकर दाखल होईल अशी अपेक्षा करुन अथवा खोट्या बातम्यावर विश्वास ठेऊन शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असे आवाहन महाराष्ट्र सरकारच्या प्रसिद्धी विभागाने प्रसिद्ध केले आहे. (Hurry up for sowing)

मान्सूनचा प्रवास या वर्षी वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे.  यंदा दहा दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. मात्र २७ मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. सध्याच्या अंदाजानुसार २७  मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, आणि किमान पाच जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे किमान पाच जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही. या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो.  (Hurry up for sowing)

या वर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे. आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Hurry up for sowing)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00