Home » Blog » Gold smuggaling :  अपहरण, चकमक आणि पोटातून सोन्याची तस्करी

Gold smuggaling :  अपहरण, चकमक आणि पोटातून सोन्याची तस्करी

by प्रतिनिधी
0 comments
Gold smuggaling

रामपूर : सौदी अरेबियातून आलेल्या चार तरुणांचे गुन्हेगारी टोळीने अपहरण केले. पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार तरुणांची सुटका झाली आणि दोन गुन्हेगार पकडले गेले. पण चौकशीत अपहरण करण्यात आलेले चार तरुण पोटातून सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती पुढे आल्यावर पोलिस चांगलेच चक्रावून गेले. पोलिसांनी चार तरुणांच्या पोटातून बाहेर काढण्यात आलेले २७० ग्रॅम सोने जप्त केले. (Gold smuggaling)

उत्तरप्रदेशातील रामपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली. दिल्ली लखनऊ रस्त्यांवर सौदी अरेबियाहून आलेल्या चार युवकांचे अपहरण करण्यात आले. शाने असल्म, मुतल्लिब, अजरुद्दीन उर्फ जुफ्लिकार दुबईहून तर नावेद उर्फ जाहीद सौदी अरेबियातून दिल्ली एअरपोर्टवर आले. त्यानंतर ते कारने रामपूरकडे जात होते. त्यांचा कारने प्रवास सुरू असताना मुंढापाडे पोलिस ठाण्याच्या परिसरात त्यांना गुन्हेगारी टोळीने पोलिस अधिकारी असल्याचे सांगून त्यांची कार थांबवली. त्यानंतर सहा जणांची चौकशी करत त्यांना जंगलात घेऊन गेले. बंदूकीचा धाक दाखवून त्यांनी पोटात लपवलेल्या सोन्याची मागणी केली. जर सोने दिले नाही तर पोट फोडून सोने घेणार अशी धमकी दिली. गुन्हेगाराची टोळी धमकी देत असतानाच कारचा चालक जुल्फिकार घटनास्थळावरुन पळून गेला आणि एका गावात आला. त्याने स्थानिक नागरिकांना अपहणाची घटना सांगितले. स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी जंगलात प्रवेश केला. यावेळी गुन्हेगारी टोळीवर पोलिसांनी गोळीबार करताच लुटमार करणारे काहीजण पळून गेले. पोलिसांनी गुन्हेगारी टोळीतील तौफिक उर्फ तुफेल आणि रजा चौधरीला अटक केली. (Gold smuggaling)

पोटात सोन्याचे कॅप्सूल

पोलिसांनी गुन्हेगारी टोळीतील पकडलेल्या दोघांकडे चौकशी केली असता चार युवकांच्या पोटात सोन्याचे कॅप्सूल असल्याचे सांगितले. पोलिसांनी चार युवकांकडे चौकशी केली असता त्यांनी नकार दिला. त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले.  त्यानंतर पोलिसांनी अपहरण झालेल्या चौघांची हॉस्पिटलमध्ये तपासणी केली. चौघांच्या पोटाचा एक्स रे ही काढला पण एक्स रे मध्ये काही मिळून आले नाही. त्यानंतर चौघांचे अल्ट्रासाउंटद्वारे पोटाची तपासणी केली असता त्यांच्या पोटात सोन्याच्या कॅप्सूल दिसून आल्या. अल्ट्रासाउंडच्या रिपोर्टनुसार मुतल्लिबच्या पोटात सोन्याच्या गोळ्यांचा गुच्छ दिसून आला. शाने च्या पोटात चार तर अजरुददीनच्या पोटात आठ, जुल्फिकारच्या पोटात सहा गोळ्या आढळल्या. त्यांच्या पोटातून आठ कॅप्सूल काढण्यात आल्या. एका कॅप्सूलमध्ये ३० ग्रॅम वजनाची आले. आत्तापर्यंत २७० गॅम सोने जप्त केले आहे. (Gold smuggaling)

सुरक्षा यंत्रणेलाही चकमा

पोलिसांनी सोने तस्करीचा नवा फंडा उघडकीस आहे. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणनेला चकमा देण्यात चौघे जण यशस्वी झाले. दुबई, सौदी अरेबिया, मुंबई आणि दिल्लीतही त्यांना कोणतीही यंत्रणा पकडू शकली. पोटात लपवून आणलेले सोने सामान्य मेटल डिटेक्टर आणि स्कॅनिंग मशिन पकडू शकली नाही. पोटातून सोन्याची तस्करी करणारी मंडळी विशेष टॉयलेटमध्ये सोन्याच्या कॅप्सूल बाहेर काढतात. त्यासाठी टॉयलेटमध्ये जाळ्या वापरल्या जातात.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00