Home » Blog » Goyal on Trump Tariff:  बंदुकीच्या धाकावर कधीही वाटाघाटी करणार नाही

Goyal on Trump Tariff:  बंदुकीच्या धाकावर कधीही वाटाघाटी करणार नाही

ट्रम्प धोरणावर गोयल यांनी भूमिका केली स्पष्ट

by प्रतिनिधी
0 comments
Goyal on Trump Tariff

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह इतर देशांवर कर लादण्यास ९० दिवसांचा स्थगिती दिली. ट्रम्प यांनी करधोरण जाहीर केल्यानंतर भारताने पहिल्यांदाच भूमिका जाहीर केली आहे. ‘‘भारत बंदुकीच्या धाकावर कधीही वाटाघाटी करणार नाही,’’ असे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी (११ एप्रिल)म्हटले आहे. (Goyal on Trump Tariff)

‘‘ व्यापार धोरणांबाबत दोन्ही बाजू असतात. एकमेकांवर होणारे परिणाम पाहूनच अशा चर्चा पुढे जात असतात. आमच्या अमेरिकेसोबत सुरू असलेल्या सर्व व्यापार चर्चा चांगल्या प्रकारे प्रगती करत आहेत. ‘इंडिया फर्स्ट’ ही आमची भूमिका आहे. अमृत कालमध्ये २०४७ मध्ये विकसित भारताकडे जाण्याचा आमचा मार्ग सुनिश्चित करण्यासाठी आमची ही भूमिका महत्त्वाची आहे,’’ असे गोयल म्हणाले. इटली-इंडिया बिझनेस, सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. (Goyal on Trump Tariff)

ते म्हणाले, ‘‘आम्ही कधीही बंदुकीच्या धाकावर वाटाघाटी करत नाही. आमच्यासाठी अनुकूल वेळ महत्त्वाची आहे. त्यामुळे जलद आणि सकारात्मक चर्चेची शक्यता असते. आमच्यादृष्टीने देशाचे आणि आमच्या नागिरकांचे हित महत्त्वाचे आहे. ते सुरक्षित असल्याची खात्री होईपर्यंत आम्ही घाई करत नाही.’’ (Goyal on Trump Tariff)

डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी चीन वगळता भारतावर २६% कर आकारणीला ९० दिवसांची स्थगिती दिली आहे.

चीनचे अमेरिकेला आव्हान

दरम्यान व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनने ताठर भूमिका कायम ठेवली आहे. त्याचवेळी ट्रम्प धोरणाला आव्हानही दिले आहे. आम्ही अमेरिकेपुढे कधीही झुकणार नाही. म्हटले आहे की, यापुढे अमेरिका जाहीर करत असलेल्या कसल्याची अतिरिक्त शुल्काच्या घोषणेवर चीन उत्तर देणार नाही. अमेरिका आता कितीही कर लादू दे, आता त्याला काहीही अर्थ राहणार नाही. जागतिक अर्थव्यवस्थेत त्याचेच हसे होणार आहे, असा दावाही चीनने केला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे की, चीन कुणाच्या धमक्यांना भीक घालणार नाही. चीन कुणालाही घबरत नाही. चीनने गेल्या ७० वर्षात अत्यंत कष्टाने आणि मेहनतीने यश मिळवले आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या पायावर उभे आहोत.

हेही वाचा :
ट्रम्पसमोर झुकणार नाही
शेअर बाजारात उसळी

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00