नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशात पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. भाजपचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना तिसऱ्यांदा रोखण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पार्टीचे जोरदार प्रयत्न सुरू असताना एमआयएमचे असुद्दीन ओवैसी आणि आझाद समाज पार्टीचे नेते चंद्रशेखर आझाद यांनी आघाडी केली आहे. सामाजिक परिवर्तन मोर्चा असे आघाडीला नाव देण्यात आले आहे. या आघाडीचा समाजावादी पार्टी आणि काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता असून भाजपला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Owaisi-Azad alliance in Uttar Pradesh)
एमआयएमचे प्रमुख ओवैसी आणि आझाद समाज पार्टीचे चंद्रशेखर आझाद यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. उत्तर प्रदेश विधानसभेतील सर्व ४०३ जागा लढवण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच चंद्रशेखर आझाद हे आघाडी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे ओवैसी यांनी घोषीत केले. भाजपला रोखण्यासाठी आमची आघाडी यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी त्यांनी व्यक्त केला.(Owaisi-Azad alliance in Uttar Pradesh)
उत्तर प्रदेशात भाजपविरोधात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची जुनी आघाडी असताना आता आझाद ओवैसी यांची तिसरी आघाडी स्थापन झाली आहे. चंद्रशेखर आझाद यांनी ही आमची तिसरी आघाडी असल्याचे अमान्य करत उत्तरप्रदेशात आम्ही पहिली आघाडी केली आहे असा दावा केला.
या आघाडीमुळे समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. दोन्ही पक्षाचा जनाधार हा मागासवर्गीय आणि मुस्लीम मतांचा आधार आहे. पण ओवैसी आझाद आघाडी दलित आणि मुस्लीम मतदारांना आपल्याकडे खेचले तर त्याचा फटका समाजवादी आणि काँग्रेसला बसणार आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस समाजवादी आघाडीचे ३७ खासदार निवडून आले होते. त्यामुळे भाजपचा चारशे पारचा फुगा फुटला होता. त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करता आला नाही. यादव, दलित, ओबीसी आणि मुस्लीम मतदारांना एकत्र आणल्यामुळे समाजवादी पार्टीला चांगले यश मिळाले होते. (Owaisi-Azad alliance in Uttar Pradesh)