Home » Blog » खोदकाम करताना सापडली १४ सोन्याची नाणी

खोदकाम करताना सापडली १४ सोन्याची नाणी

by प्रतिनिधी
0 comments
Gold coins were found in Inchal village

बेळगाव : प्रतिनिधी : बैलहोंगल तालुक्यातील इंचल गावात व्ही. बी. जी.  राम योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामाच्या वेळी माती  खणत असताना कामगारांना सोन्याची चौदा प्राचीन नाणी सापडली.या नाण्यावर हत्तीचे चित्र असून ही नाणी दहाव्या ते पंधराव्या शतकतील असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Gold coins were found in Inchal village)

 बैलहोंगल तालुक्यातील इंचल गावात खोदकाम सुरु असताना एका मडक्यात सोन्याची चौदा नाणी सापडली आहेत. सापडलेली नाणी मजुरानी  स्वतःकडे न ठेवता  ती तातडीने ग्रामपंचायत कार्यालयात जमा केली.इंचल येथील बीसीएम वसतिगृहाजवळ व्ही बी जी  रामजी योजनेंतर्गत काम सुरू होते. काम करत असताना मजुरांना एक मडके सापडले आणि त्या मडक्यात  चौदा सोन्याची नाणी आढळली. नंतर ही नाणी तहसीलदारांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. (Gold coins were found in Inchal village)

नाण्यांवर आढळलेल्या  हत्तीच्या चित्रावरून   या नाण्यांचा संबंध पश्चिम गंगांच्या तळकाड राजवटीशी किंवा विजयनगर साम्राज्याच्या काळाशी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही नाण्यांच्या दर्शनी भागावर अलंकारयुक्त हत्तीचे चित्र दिसून येते. पश्चिम गंग राजवटीच्या राजचिन्हाशी संबंधित हत्तीच्या प्रतिमेमुळे या नाण्यांना ऐतिहासिक महत्त्व असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Gold coins were found in Inchal village)

You may also like

error: Content is protected !!