Home » Blog » Gadgil criticizes Modi : लष्करी सामग्री निर्मितीबाबत मोदी सरकार असंवेदनशील

Gadgil criticizes Modi : लष्करी सामग्री निर्मितीबाबत मोदी सरकार असंवेदनशील

by प्रतिनिधी
0 comments
Gadgil criticize Modi

जमीर काझी :  मुंबई : भारतामध्ये हवाई दलाला लागणाऱ्या सामग्री निर्मितीसाठी कंपन्यांबरोबर करार करूनही गेल्या ४ वर्षात एकही विमान हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आलेले नाही. ‘ऑपरेशन सिंदुर’च्या  राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारचे यामुळे पितळ उघडे पडले आहे, अशी घणाघती टीका काँग्रेस प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी रविवारी केली. (Gadgil criticizes Modi)

ते म्हणाले,’  केंद्र सरकार युद्ध सामुग्री निर्मितीच्या मोठा गाजावाजा करते, त्याला वारेमाप प्रसिद्धीही दिली जाते पण प्रत्यक्षात मात्र वर्षानुवर्षे सदर सामुग्री हवाई दलास पुरविलीच जात नाही. ही बाब खुद्द भारताच्या हवाईदल प्रमुखांनीच दिल्लीतील एका कार्यक्रमात नुकतीच स्पष्ट्पणे मांडली आहे.

सरकारने २०२१ साली एक सार्वजनिक उपक्रम व एक खासगी कंपनी सोबत लढाऊ विमान निर्मितीचा करार होऊनही गेल्या चार वर्षात एकही विमान हवाई दलाकडे सुपूर्द करता आले नाही. ही गंभीर बाब आता उघड झाली आहे. त्यामुळे मोदी सरकारचे पितळ यामुळे उघडे पडले आहे. (Gadgil criticizes Modi)

अनंत म्हणाले,’ लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी राफेल विमान यांचा दर्जा व खरेदीचा व्यवहार याबाबत काही शंका उपस्थित केल्या होत्या. त्यावेळी भाजपा ते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, अशी  टीकेची झोड उठवली होती. ऑपरेशन सिंदूर दरम्यान राफेल विमान पाडण्यात आले होते की नाही असा काँग्रेसतर्फे प्रश्न विचारला असताना, पाकिस्तानची किती विमान पाडली हे काँग्रेस का नाही विचारत? असा उलट प्रश्न करत मूळ प्रश्नाला बगल दिली गेली होती. आजही मोदी सरकारतर्फे अजूनही याबाबत अधिकृत उत्तर देण्यात आलेले नाही. याउलट तिन्ही दलाचे प्रमुख अनिल चौहान यांनीच ही बाब आता मान्य केली. इतकेच नव्हे तर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी तर ५ राफेल पाडली गेल्याचे विधान केले आहे. मग आता अनिल चौहान व स्वामी कुणाची भाषा बोलत आहेत याचा भाजप खुलासा करणार का ? असा प्रतिप्रश्न गाडगीळ यांनी विचारला आहे.अमेरिकेच्या एका वृत्तवाहिनीवर भारताच्या राफेल विमानाचे अवशेषही दाखविण्यात आले ते दृश्य खरे आहे की खोटे? याचाही खुलासा  सरकारकडून अजूनही करण्यात आलेला नाही.  आता तर पाश्चिमात्य देशांनी राफेल विमानांबाबत फेरनिरीक्षण सुरु केल्याचे वृत्तही असून पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारने याबाबतची भूमिका तातडीने स्पष्ट करावी, अशी मागणी ही त्यांनी केली  (Gadgil criticizes Modi)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00