Home » Blog » Modi on Farmer : शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही: पंतप्रधान मोदी

Modi on Farmer : शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही: पंतप्रधान मोदी

by प्रतिनिधी
0 comments
Modi on Farmer

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे कल्याण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अमेरिकेसोबतच्या प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट) शेतकरीवर्गाला आश्वस्त केले. (Modi on Farmer)

ते म्हणाले की, भारत शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी तडजोड करणार नाही. ‘‘मला माहित आहे की, वैयक्तिकरित्या, अशी भूमिका घेतल्याबद्दल मला मोठी किंमत मोजावी लागेल. पण मी यासाठी तयार आहे.’’

एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषद २०२५ च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. ही परिषद एम.एस. स्वामीनाथन फाउंडेशनने आयोजित केली होती. (Modi on Farmer)

पंतप्रधान म्हणाले की, भारत आपल्या शेतकऱ्यांसाठी, पशुपालकांसाठी आणि मच्छीमारांच्या विकासासाठी सज्ज आहे. ‘‘आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. उत्पन्नाचे नवनवे स्रोत शोधण्यासाठी सातत्याने काम करत आहोत. आमच्या सरकारने या शतकाच्या प्रगतीचा आधार असलेल्या शेतकऱ्यांच्या ताकदीचा विचार केला आहे.’’ (Modi on Farmer)

प्रो. स्वामीनाथन यांच्या योगदानाचे कौतुक करताना ते म्हणाले, त्यांची सेवा एका विशिष्ट काळासाठी किंवा विशिष्ट भौगोलिक क्षेत्रापुरती मर्यादित असू शकत नाही. प्रो. स्वामीनाथन हे एक महान शास्त्रज्ञ आणि भारताचे महान सुपुत्र होते. त्यांनी विज्ञानाचा उपयोग लोकांची सेवा करण्यासाठी केला. देशाची अन्न सुरक्षा हे त्यांचे जीवन ध्येय होते. त्यांचे दृष्टिकोन देशाच्या धोरणांना आणि प्राधान्यांना मार्गदर्शन करत राहील,” असे पंतप्रधान म्हणाले.

“त्यांनी शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी सदैव हरित क्रांती आणि जैव गावांची संकल्पना दिली,” असे ते म्हणाले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00