Home » Blog » पाच दिवसात दुसऱ्यांदा पेट्रोल,डिझेल दरात वाढ

पाच दिवसात दुसऱ्यांदा पेट्रोल,डिझेल दरात वाढ

by प्रतिनिधी
0 comments
Fuel prices hiked for the second time in five days

मुंबई : प्रतिनिधी : कच्च्या तेलाच्या दरवाढीचे चटके भारताला बसू लागले आहेत. अवघ्या पाच दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात ९१ पैसे तर डिझेलच्या दरात ९४ पैशांची वाढ झाली आहे.  इंधनाच्या दरवाढीमुळे महागाई आगडोंब उसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. (Fuel prices hiked for the second time in five days)

जगभर इंधनाचे दर वाढले आहेत. पण केंद्रातील मोदी सरकारने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमुळे इंधनाच्या दरात वाढ केली नव्हती. निवडणुकीचे निकाल लागल्यावर युद्ध्दपातळीवर केंद्र सरकारने इंधनाच्या दरात वाढ केली आहे. १५ मे रोजी पेट्रोलच्या दरात तीन रुपये आणि डिझेलच्या दरात ३ रुपये ११ पैसे वाढ झाली आहे. त्यानंतर अवघ्या पाच दिवसात पुन्हा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात ९१ पैशांची वाढ केल्याने पाच दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात पाच दिवसात सलग दोन वेळा दरवाढ केल्याने प्रतिलिटर चार रुपयांची वाढ झाली आहे. (Fuel prices hiked for the second time in five days)

इंधन दरवाढीवर राऊतांची ‘जय श्रीराम’ अशी प्रतिक्रिया… शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यांना सलग दुसऱ्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली आहे असा प्रश्न केला असता ते म्हणाले, एकाच आठवड्यात इंधनाच्या दुसऱ्यांदा किंमती वाढल्या आहेत. आता रुपया पूर्णपणे कोसळला आहे. किंमती वाढल्या आहेत. यात नवीन काय आहे? हे तर घडणार आहे. जर तुम्ही भाजपचे समर्थक असाला तर फक्त जय श्रीराम चा जप करा. म्हणजे किंमती १० रुपयांची कमी होतील. जय श्रीराम म्हणा, सर्व काही उपलब्ध होईल. हाच भाजपचा मंत्र आहे असा टोलाही मारला. आमच्या सारखे लोक मात्र संघर्ष करतील, निदर्शने करती आणि आंदोलन सुरूच ठेवतील असेही राऊत म्हणाले. (Fuel prices hiked for the second time in five days)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00