Home » Blog » Vaishnavi hagwane: वैष्णवीबाबतच्या अहवालात धक्कादायक माहिती?

Vaishnavi hagwane: वैष्णवीबाबतच्या अहवालात धक्कादायक माहिती?

मृत्यूवरून आरोप-प्रत्यारोप

by प्रतिनिधी
0 comments
Vaishnavi hagwane death

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सून वैष्णवी हिचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यात काही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. वैष्णवी हिच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, असे शवविच्छेदन अहवालात नमूद म्हटले असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Vaishnavi hagwane)

वैष्णवीने गळफास घेऊन जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे.

वैष्णवी हिच्या मृत्यूवरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर आलेल्या या अहवालामुळेही आरोप-प्रत्यारोपांची धार तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वैष्णवीने शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवले होते. त्यानंतर तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहे. वैष्णवीचे वडील आनंद उर्फ अनिल साहेबराव कस्पटे यांनी सासरच्या मंडळींविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार  वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता, साससे राजेंद्र हगवणे, नणंद करीश्मा राजेंद्र हगवणे, दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Vaishnavi hagwane)

वैष्णवीचा पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी यांना क्रूर वागणूक दिली, असा आरोपही वैष्णवीच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे.

दरम्यान, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे सध्या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सुषमा अंधारेंचा अजित पवारांना सवाल

वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांना थेट सवाल केला आहे. राष्ट्रवादीचा मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेला अटक कधी होणार आहे?, अशी विचारणा अंधारे यांनी केली आहे. (Vaishnavi hagwane)

‘‘जमीन खरेदीसाठी माहेरून दोन कोटी रुपये आणण्यासाठी सुनेचा अत्याधिक छळ करून तिची हत्या /आत्महत्या इथंर्यंत मजल मारणाऱ्या मुळशी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र हगवलेला अटक कधी होणार? अजितदादा, तुम्ही सत्तेत आहात. पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या  वैष्णवीला न्याय देणार?’’, असा संतप्त सवाल अंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून केला आहे. अंधारे यांनी यासंबंधीची पोस्टही ‘एक्स’वर केली आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00