बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची तीनशे कोटी रुपये किमतीची स्थावर संपत्ती जप्त केली आहे. ईडीने ही कारवाई केली असून १४२ प्रापर्टिज सील केल्या आहेत. म्हैसूर अर्बन डेव्हलेपमेंट अथॉरिटी (मुडा) संबंधित मनी लॉडिंग लाँड्रिंग त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
ईडीने यासंबंधीच्या पत्रकात म्हटले आही की, ‘ जप्त केलेली संपत्ती वेगवेगळ्या लोकांच्या नावावर रजिस्टर केली आहे. हे लोक रियल इस्टेट आणि एजंट म्हणून काम करतात.’ (MUDA Scam)
मुडा वर आरोप आहे की २०२२ मध्ये सिद्धरामय्या यांची पत्नी पार्वती यांना म्हैसूरमधील कसारा गावातील ३.१६ एकर जमिनीच्या मोबदल्यात म्हैसूरमधील एका पंचतारांकित परिसरात १४ भूख्ंड मिळवले. त्यांची किंमत पार्वती यांच्या जमिनीच्या तुलनेत मोठी आहे. ३.१६ एकर जमिनीवर पार्वती यांचा कायदेशीरदृष्टया अधिकार नाही. सिद्धरामय्यांनी ‘मुडा’द्वारे अधिग्रहित केलेल्या तीन एकर १६ गुंठे जमिनीच्या बदल्यात आपली पत्नी पार्वती यांच्या नावावर १४ भूखंडांसाठी मोबदला मिळवण्यासाठी आपला राजकीय दबाव वापरला. ही जमीन मूलत: मुडाद्वारे ३,२४,७०० रुपये इतक्या किमतीत अधिग्रहित केली होती. ही जमीन त्यांचे भाऊ मल्लिकार्जुन यांनी २०१० मध्ये भेट म्हणून दिली होती. ‘मुडा’ने या जमिनीचे अधिग्रहण न करता देवनूर स्टेज तीन लेआउटचा विकास केला होता.(MUDA Scam)
दरम्यान, भाजप सरकारच्या काळात ही जमीन मिळाली होती, असे सिद्धारामय्या यांचे म्हणणे आहे. २०१४ मध्ये ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या पत्नीने भरपाईसाठी अर्ज केला होता. मात्र मी मुख्यमंत्री असल्याने नुकसानभरपाईसाठी अर्ज करु नये, असे मी पत्नीला सांगितले होते. २०२०-२१ मध्ये भाजपचे सरकार होते. त्यावेळी पत्नीने भरपाईच्या बदल्यात जमीन अधिग्रहीत केली होती. आता भाजप निव्वळ आरोप करण्याचे प्रयत्न करत आहे, असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला.(MUDA Scam)
-
ईडीचे म्हणणे काय?
- सिद्धरामय्यांनी ‘मुडा’द्वारे अधिग्रहित केलेल्या तीन एकर १६ गुंठे जमिनीच्या बदल्यात आपली पत्नी पार्वती यांच्या नावावर १४ भूखंडांसाठी मोबदला मिळवण्यासाठी आपला राजकीय दबाव वापरला. ही जमीन मूलत: मुडाद्वारे ३,२४,७०० रुपये इतक्या किमतीत अधिग्रहित केली होती. या एकदम मोक्याच्या आणि अत्यंत उच्चभ्रू परिसरातील जागेतील १४ भूखंडाच्या रुपात दिलेल्या जमिनीचा मोबदाला ५४ कोटी रुपये आहे, असे ईडीने म्हटले आहे.(MUDA Scam)
-
सिद्धरामय्यांवरील आरोप
- ‘मुडा’ कडून भरपाईच्या मोबदल्यात सिद्धरामय्या यांच्या पत्नीला मिळालेल्या विजयनगर प्लॉटची किंमत कसारे गावातील जमिनीपेक्षा खूप जास्त आहे.
- स्नेहमयी कृष्णा यांनी सिद्धरामय्या यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये सिद्धारामय्यांनी मुडा साईटवरील जमिनीवर दावा करण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रात घोटाळ्याचा आरोप केला आहे.
- १९९८ ते २०२३ पर्यंत सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. ते या घोटाळ्यात सहभागी आहेत. त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर आपल्या जवळच्या लोकांना मदत होईल, असा केला आहे.
ED, Bangalore has provisionally attached 142 immovable properties having market value of Rs. 300 Crore (approx.) registered in the name of various individuals who are working as real-estate businessmen and agents under the provisions of the PMLA, 2002, in connection with the case…
— ED (@dir_ed) January 17, 2025
हेही वाचा :
अंडरवर्ल्ड कनेक्शन नाही