Home » Blog » झोपेत श्वास अडखळणाऱ्या विकारावरील औषधाला मंजुरी

झोपेत श्वास अडखळणाऱ्या विकारावरील औषधाला मंजुरी

Obstructive Sleep Apnea च्या उपचारासाठी मंजूर केलेले झेपबाउंड हे पहिले प्रिस्क्रिप्शन औषध आहे.

by प्रतिनिधी
0 comments
Obstructive Sleep Apnea

महाराष्ट्र दिनमान : अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाने (FDA) शुक्रवारी (दि.२०) झेपबाउंड (Zepbound) या वजन कमी करण्यासाठीच्या औषधाला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (Obstructive Sleep Apnea) च्या उपचारासाठी मंजुरी दिली आहे. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामध्ये लोकांना झोपेत श्वास घेण्यास अडचण येते आणि काही वेळा ते धापा टाकत जागे होतात. जर हे उपचाराशिवाय राहिले, तर यामुळे हृदयविकार, मधुमेह, स्ट्रोक आणि विस्मृती (डिमेन्शिया) यांसारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. या आजारासाठी मंजूर केलेले हे पहिले प्रिस्क्रिप्शन औषध आहे.

झेपबाउंडचे निर्माते, इलाय लिली (Eli Lilly), यांनी सांगितले की, जास्त वजन आणि मध्यम ते गंभीर ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया असलेल्या लोकांसाठी या औषधाला मंजूरी मिळाली आहे. लाखो अमेरिकन लोक या आजाराने त्रस्त आहेत, ज्यापैकी अनेकांना लठ्ठपणाही आहे. कमी कॅलरीचा आहार आणि वाढीव शारीरिक सक्रियतेसोबत औषध वापरण्याची शिफारस केली जाते, असे कंपनीने म्हटले आहे. (obstructive sleep apnea)

जून महिन्यात झालेल्या दोन अभ्यासांमध्ये आढळले की, झेपबाउंड घेतलेल्या लोकांच्या स्लीप एपनियाच्या लक्षणांमध्ये, झोपेत होणाऱ्या व्यत्ययांमध्ये, प्लेसीबो घेतलेल्या लोकांच्या तुलनेत मोठा सुधार झाल्याचे जून महिन्यात झालेल्या अभ्यासामध्ये आढळून आले होते.

येल सेंटर्स फॉर स्लीप मेडिसिनच्या सहाय्यक वैद्यकीय संचालक, डॉ. व्हिवियन असारे यांनी सांगितले की, “या मंजुरीमुळे रुग्णांसाठी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. स्लीप एपनियाच्या रुग्णांसाठी प्रामुख्याने CPAP मशीनचा उपयोग केला जातो, जे झोपेत श्वसनमार्ग खुला ठेवते. मात्र, हे यंत्र वापरणे अनेकदा अडचणीचे ठरते. सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत ६५ वर्षांवरील लोकांमध्ये हा विकार अधिक प्रमाणात आढळतो.

डॉक्टर सहसा लठ्ठपणा आणि स्लीप एपनियासह रुग्णांना लक्षणे सुधारण्यासाठी वजन कमी करण्याचा सल्ला देतात. झेपबाउंडमध्ये असलेले तिरझेपाटाइड (Tirzepatide) हे संयुग वजन कमी करण्यात अत्यंत प्रभावी आहे. तिरझेपाटाइड हेच संयुग मौन्जारो (Mounjaro) या मधुमेहासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधातही आहे. FDA च्या मंजुरीपूर्वीच, काही डॉक्टर स्लीप एपनियाच्या रुग्णांना वजन कमी करण्याची औषधे देत होते.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00