नवी दिल्ली : राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी गुरुवारी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या विरोधातील महाभियोग नोटीस फेटाळून लावली. राज्यसभेचे सभापती असलेले धनकड राज्यसभा कामकाजादरम्यान विरोधी पक्षांना पक्षपाती वागणूक देतात. त्यामुळे त्यांना हटवण्याची मागणी करणारी महाभियोग नोटीस विरोधकांनी दाखल केली होती. (dhanakad)
ही नोटीस घाईघाईने दाखल करण्यात आली. ती सदोष आणि धनकड यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने केली होती, असे या निर्णयात म्हटले आहे.
राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी यांनी सभागृहात सादर केलेल्या या निर्णयात म्हटले आहे की, संवैधानिक संस्था कमजोर करण्यासाठी आणि विद्यमान उपराष्ट्रपतींना बदनाम करण्यासाठी ही नोटीस दिली होती.(dhanakad)
धनकड यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी १० डिसेंबर रोजी करण्यात आली होती. या नोटीसीवर विरोधी पक्षांच्या ६० खासदारांनी सह्या केल्या होत्या. त्यांनी त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता.
हेही वाचा :