नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी सोमवारी (२१ जुलै) रात्री उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी आरोग्यविषयक कारण सांगितले आहे. आरोग्याची समस्या असल्याने वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्याची गरज असल्याचे त्यात त्यांनी म्हटले आहे.(Dhanakad resigns)
राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन “आरोग्यसेवेला प्राधान्य” देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “आरोग्यसेवेला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी, मी संविधानाच्या कलम ६७(अ) नुसार तत्काळ प्रभावाने भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे. (Dhanakad resigns)
धनखड यांनी राष्ट्रपतींच्या “अटल पाठिंब्याबद्दल” कृतज्ञता व्यक्त केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. आपल्या कार्यकाळात पंतप्रधानांचा अमूल्य पाठिंबा मिळाला, असे त्यांनी म्हटले आहे.(Dhanakad resigns)
धनखड यांचे राजीनामा पत्र
सर्व माननीय संसद सदस्यांकडून मला मिळालेली मायेची उब, विश्वास आणि प्रेम नेहमीच माझ्या स्मृतीत राहील आणि माझ्या आठवणीत राहील, असे त्यांनी आपल्या कारकीर्दीविषयी म्हटले आहे. आपल्या कार्यकाळात भारताची उल्लेखनीय आर्थिक प्रगती आणि अभूतपूर्व विकास पाहणे हा एक संस्मरणीय अनुभव होता. पदभार सोडताना, त्यांनी देशाच्या भविष्यावर “अटल विश्वास” व्यक्त केला आणि भारताच्या जागतिक उदयाला “अभूतपूर्व” म्हटले आहे.
Jagdeep Dhanakad
Dhanakad Criticized SC: राष्ट्रपतींना निर्देश देण्याचा अधिकार न्यायपालिकेला नाही
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी राज्यपालांनी राखून ठेवलेल्या विधेयकावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर टीका केली. राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना कालमर्यादा निश्चित करण्याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. या निकालावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गुरुवारी (१७ एप्रिल) टीका केली. अशा निर्देशांमुळे देशाच्या सर्वोच्च पदाची घटनात्मक भूमिका कमकुवत होते, असे मतही धनकड यांनी व्यक्त केले.(Dhanakad Criticized SC)
ते राज्यसभेच्या सहाव्या तुकडीच्या इंटर्नशी बोलत होते. “तुम्ही भारताच्या राष्ट्रपतींना निर्देश देण्याइतकी आपल्याकडे परिस्थिती येऊ शकत नाही. तुम्ही कोणत्या आधारावर तसे निर्देश देता?,” असा प्रश्नही धनखड यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, “अलिकडेच दिलेल्या निकालाद्वारे राष्ट्रपतींना निर्देश दिले जातात. आपण कुठे जात आहोत? देशात काय चालले आहे? आपल्याला अत्यंत संवेदनशील राहावे लागेल. कोणीतरी पुनरावलोकन दाखल करावे की नाही हा प्रश्न नाही. आपण लोकशाहीसाठी कधीही सौदेबाजी केली नाही. राष्ट्रपतींना कालबद्ध पद्धतीने निर्णय घेण्याचे आवाहन केले जाते आणि जर तसे झाले नाही तर ते कायदा बनते,” असे धनखड म्हणाले. (Dhanakad Criticized SC)
‘‘राष्ट्रपतींना वेळेच्या आत निर्णय घेण्याचे आवाहन केले जाते. जर तसे झाले नाही तर कायदा अस्तित्वात येईल, असे सांगितले जाते. आपल्याकडे असे न्यायाधीश आहेत जे कायदे करतील, जे कार्यकारी कार्ये पार पाडण्याची भूमिका बजावतील, जे सुपर पार्लमेंट म्हणून काम करतील. एवढे करूनही त्यांची कोणतीही जबाबदारी असणार नाही कारण त्यांना देशाचा कायदा लागू होत नाही,’’ अशी टीका त्यांनी केली.
कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार
उपराष्ट्रपती धनकडे म्हणाले की, कलम १४५(३) अंतर्गत कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार संविधानाने न्यायपालिकेला आहे, परंतु ते राष्ट्रपतींना निर्देश देण्याचा अधिकार न्यायालयांना देत नाही. संविधानानुसार तुम्हाला फक्त कलम १४५(३) अंतर्गत संविधानाचा अर्थ लावण्याचा अधिकार आहे. तेथेही पाच किंवा त्याहून अधिक न्यायाधीश असणे आवश्यक आहे.’’ (Dhanakad Criticized SC)
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय? सर्वोच्च न्यायालयाने ८ एप्रिल रोजी दिलेल्या निकालाच्या उत्तरादाखल उपराष्ट्रपतींनी ही टिप्पणी केली आहे. राज्यपालांनी राखीव ठेवलेल्या विधेयकांवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रपतींना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. हा ऐतिहासिक निकाल न्यायालयाने पहिल्यांदाच दिला. या कालावधीपेक्षा जास्त विलंब लागत असेल तर योग्य असला पाहिजे आणि राज्य सरकारांना अशा बाबींवर केंद्राला सहकार्य करण्याचे आवाहनही कोर्टाने केले आहे. तामिळनाडूमध्ये झालेल्या घटनात्मक पेचानंतर हा निर्णय देण्यात आला. राज्यपाल आर.एन. रवी यांनी अनेक विधेयकांची मान्यता दीर्घकाळ रोखली होती. त्यामुळे तामिळनाडू सरकारने न्यायालयीन हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
President of India is a very elevated position. President takes oath to preserve, protect and defend the constitution. This oath is taken only by the President and the Governors.
— Vice-President of India (@VPIndia) April 17, 2025
If you look at the Indian Constitution, the President is the first part of the Parliament. Second… pic.twitter.com/Tfr8c6dPot
हेही वाचा :
मुस्लिमेतरांना तूर्त ‘वक्फ’वर नियुक्त करणार नाही
मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही
नवी दिल्ली : राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी गुरुवारी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या विरोधातील महाभियोग नोटीस फेटाळून लावली. राज्यसभेचे सभापती असलेले धनकड राज्यसभा कामकाजादरम्यान विरोधी पक्षांना पक्षपाती वागणूक देतात. त्यामुळे त्यांना हटवण्याची मागणी करणारी महाभियोग नोटीस विरोधकांनी दाखल केली होती. (dhanakad)
ही नोटीस घाईघाईने दाखल करण्यात आली. ती सदोष आणि धनकड यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने केली होती, असे या निर्णयात म्हटले आहे.
राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी यांनी सभागृहात सादर केलेल्या या निर्णयात म्हटले आहे की, संवैधानिक संस्था कमजोर करण्यासाठी आणि विद्यमान उपराष्ट्रपतींना बदनाम करण्यासाठी ही नोटीस दिली होती.(dhanakad)
धनकड यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी १० डिसेंबर रोजी करण्यात आली होती. या नोटीसीवर विरोधी पक्षांच्या ६० खासदारांनी सह्या केल्या होत्या. त्यांनी त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता.
हेही वाचा :
अमित शाहांच्या वक्तव्याचे संसद, विधानसभेत तीव्र पडसाद
अमित शाहांच्या वक्तव्याचे संसद, विधानसभेत तीव्र पडसाद
नवी दिल्ली :
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांना भविष्यातील आणखी चांगल्या पदाची अपेक्षा असल्याचे जाणवते, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. धनकड सभागृहात पक्षपातीपणा करत आहेत. त्यांचे सभागृहातील वर्तन चिंता वाढवणारे आहे. त्यामुळे त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. (jagdeep Dhanakad)
विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करण्याची आणि सरकारची वारंवार प्रशंसा करण्याची धनकड यांची प्रवृत्ती पक्षपाती आहे. १९५२ पासून सभापतींवर अविश्वास ठराव आणण्याची वेळ कधीच आली नव्हती. मात्र सध्याचे सभापतींचे वर्तन पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे. आतापर्यंतचे सभापती कधीही राजकारणात गुंतले नव्हते. धनकड पक्षपाती वागत आहेत. सभागृहात ते नियमांपेक्षा राजकारणाला प्राधान्य देत आहेत. त्यांच्यामुळेच सभागृहातील कामकाजात अडथळे येत आहेत, असा आरोपही खर्गे यांनी केला. (jagdeep Dhanakad)
धनकड विरोधी पक्षनेत्यांना लक्ष्य करतात. सभागृहात अनेकदा सरकारचे कौतुक करतात. सभागृहाचा अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या नेत्यांना ते प्रवचन देतात. त्यांना बोलण्यापासून रोखले जाते. एखाद्या मुख्याध्यापकासारखे त्यांचे वर्तन असते, अशी टीका खर्गे यांनी केली.
दरम्यान, धनकड यांच्याविरोधात विरोधकांनी बुधवारीही सभागृहात घोषणाबाजी केली. अविश्वास ठरावासह अन्य मुद्द्यांवर गदारोळ उडाल्याने बुधवारीही राज्यसभेचे कामकाज होऊ शकले नाही.(jagdeep Dhanakad)
साधे बहुमत आवश्य
राज्यसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. तशी नोटीस इंडिया आघाडीने दिली आहे. हा प्रस्ताव आल्यास तो मंजूर होण्यासाठी साधे बहुमत आवश्यक आहे. मात्र २४३ सदस्यांच्या सभागृहात त्यांच्याकडे आवश्यक संख्याबळ नाही. तथापि, ‘संसदीय लोकशाहीसाठी लढण्याचा एक मजबूत संदेश,’ लोकांपर्यंत जाण्यासाठी हा प्रस्ताव आणल्याचे इंडिया आघाडीच्या नेत्यांचे मत आहे.
६० सदस्यांच्या स्वाक्षऱ्या
काँग्रेस, आरजेडी, टीएमसी, सीपीआय, सीपीआय-एम, जेएमएम, आप, डीएमके, समाजवादी पक्षासह ६० विरोधी खासदारांच्या स्वाक्षरी असलेली नोटीस विरोधकांच्यावतीने दिली आहे. राज्यसभेच्या सचिवांकडे काँग्रेस नेते जयराम रमेश आणि नसीर हुसेन यांनी ही नोटीस सादर केली. विशेष म्हणजे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि विविध विरोधी पक्षांचे नेते यांच्या या नोटिसीवर स्वाक्षऱ्या नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.
सभागृहातील संख्याबळ
भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे राज्यसभेत १२१ सदस्य आहेत. विरोधी पक्षांचे ८६ सदस्य आहेत. वायएसआरसीपी, बीजेडी, एआयएडीएमके, बीआरएस आणि बसपा यांसारख्या असंलग्न पक्षांचे एकूण २४ सदस्य आहेत.
https://x.com/kharge?ref_src=twsrc%5Egoogle%7Ctwcamp%5Eserp%7Ctwgr%5Eauthor
हेही वाचा :
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम कृष्णा यांचे निधन
सोनिया गांधीः चावीची बाहुली ते सरकारचा रिमोट