Home » Blog » Disha salian death: दिशा सालियन मृत्यूची निष्पक्ष चौकशी करा

Disha salian death: दिशा सालियन मृत्यूची निष्पक्ष चौकशी करा

शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचे मूक आंदोलन

by प्रतिनिधी
0 comments
Disha salian death

मुंबई : विशेष प्रतिनिधी : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची ‘सीबीआय’कडून सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, या मागणीसाठी गुरुवारी (२० मार्च) शिवसेना  शिंदे गटाचेच्या आमदारांनी मूक आंदोलन केले. विधानभवन परिसरात यावेळी त्यांनी फलक झळकावले. दिशाच्या वडिलांनी काही लोकांवर संशय व्यक्त केला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. दिशाच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.(Disha salian death)

दिशा सालियन हिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव येत आहे. सालियन कुटुंबाला कोणी त्रास दिला का, दबाव टाकला का याची चौकशी व्हायला हवी, असे शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या. (Disha salian death)

या प्रकरणाला कोणताही राजकीय रंग दिलेला नाही. पाच वर्षांत या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे दिशा सालियनचे वडील न्यायालयात गेल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, दिशाच्या वडिलांनी ही हत्याच असल्याचा संशय व्यक्त केला आहे. एखाद्या व्यक्तीची बॉडी १४ व्या मजल्यावरून पडते, तरीही त्या व्यक्तीच्या बॉडीवर एकही जखम दिसून येत नाही, याकडे दिशाच्या वडीलांनी लक्ष वेधले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. (Disha salian death)

डॉ. कायंदे म्हणाल्या, आम्ही कोणावरही आरोप केलेले नाहीत. दिशाच्या वडिलांनी काही लोकांवर संशय व्यक्त केला आहे. त्यामागे निश्चित काही कारणे किंवा त्यांची माहिती असेल. आधीची काही पार्श्वभूमी असेल. आमचे एवढेच म्हणणे आहे की त्या दुर्दैवी वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. सीबीआयकडे हे प्रकरण पुन्हा सोपवावे, प्रकरणाची नव्याने चौकशी करावी, अशी मागणीही कायंदे यांनी केली.

हेही वाचा :
विधानसभा अध्यक्ष, सभापतींकडून पक्षपातीपणा
देवेंद्र फडणवीस हे सुटाबुटातले `योगी`


You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00