Home » Blog » Dilbahar Talim : ‘दिलबहार’ उपांत्य फेरीत दाखल

Dilbahar Talim : ‘दिलबहार’ उपांत्य फेरीत दाखल

उत्तरेश्वर तालीम पराभूत

by प्रतिनिधी
0 comments
Dilbahar Talim

कोल्हापूर :प्रतिनिधी : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाचा ४-० असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Dilbahar Talim)

आज झालेल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उत्तरेश्वर संघास डोके वर काढून दिले नाही. सामन्याच्या २५ मिनिटाला प्रथम भोसलेने गोल करत दिलबहारचे खाते उघडले. ३५ व्या मिनिटाला शोयब बागवाने गोल करत दिलबहारला २-० असे आघाडीवर नेले. हीच स्थिती मध्यंत्तरापर्यंत कायम राहिली. (Dilbahar Talim)

उत्तरार्धातील खेळावरही दिलबहारने वर्चस्व कायम ठेवले. ४८ व्या मिनिटाला आयुष पाटीलच्या पासवर अझिझ मोमीनने गोल केला. त्यानंतर ५२ व्या मिनिटाला सतेज साळोखेच्या पासवर शोयब बागवान वैयक्तिक दुसरा आणि संघाचा चौथा गोल नोंदवला. चार गोलची घसघशीत आघाडी कायम टिकवत दिलबहार संघाने सामना जिंकून उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला. उत्तरेश्वरकडून मयूर कदम, नयन सूर्यवंशी, रोहित भोसले, तुषार पुनाळकर, ऋषिकेश तांबे यांचा चांगला खेळ झाला. दोन गोलची नोंद करणाऱ्या शोयब बागवान याची सामनावीर म्हणून निवड झाली. (Dilbahar Talim)

सोमवारचा सामना : पाटाकडील तालीम मंडळ अ वि. संध्यामठ तरुण मंडळ, दुपारी ४.०० वा. (Dilbahar Talim)

हेही वाचा :

भारतासमोर २५२ धावांचे आव्हान

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00