Home » Blog » मधुमेहामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर ११.४ लाख कोटी डॉलर्सचा बोजा

मधुमेहामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर ११.४ लाख कोटी डॉलर्सचा बोजा

by प्रतिनिधी
0 comments
Diabetes burdens Indian economy

जगभरात सध्या सुमारे ८३ कोटी प्रौढ लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. यापैकी एक चतुर्थांशाहून अधिक म्हणजे सुमारे २१.२ कोटी लोक भारतातील आहेत.मधुमेह आता भारतात केवळ आरोग्याची समस्या राहिलेली नाहीतर तो देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार बनत चालला आहे. एका नव्या आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसारमधुमेहामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या नुकसानीचा अंदाज ११.४ लाख कोटी डॉलर इतका आहे.या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून तेथे मधुमेहामुळे सुमारे साडेसोळा लाख कोटी डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. तर चीन अकरा लाख कोटी डॉलर नुकसानीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ललित मौर्या

हा अहवाल अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा जगभरात ८३ कोटी प्रौढ लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. त्यातील सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. चीनमध्ये ही संख्या सुमारे १४.८ कोटी आहे. चिंतेची बाब म्हणजे, भारतामधील सुमारे ६२ टक्के मधुमेह रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.

अंदाजानुसार, २०५० पर्यंत जगभरात १३० कोटी लोक मधुमेहासोबत जगण्यास मजबूर असतील. ही आजारपणाची स्थिती जगातील सर्वात सामान्य असंसर्गजन्य आजारांपैकी एक आहे. प्रत्येक दहामधील एक प्रौढ व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहे. रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्था आणि अर्थव्यवस्था दोन्हींसमोर मोठे आव्हान उभे राहत आहे. (Diabetes burdens Indian economy)

मधुमेह म्हणजे काय?…. मधुमेह हा असा आजार आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण खूप वाढते. याला ‘डायबिटीज’ किंवा ‘शुगर’ असेही म्हणतात. हा चयापचयाशी संबंधित आजार आहे. हा आजार आनुवंशिक कारणांमुळे किंवा चुकीच्या आहार व जीवनशैलीमुळे होऊ शकतो. शरीरातील पॅन्क्रियाज ग्रंथीतून पुरेसे इन्सुलिन तयार न झाल्यास किंवा ते योग्य प्रमाणात काम न केल्यास रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि मधुमेह होतो.

 अभ्यासाबाबत माहिती… हा अभ्यास इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अप्लाइड सिस्टीम्स अ‍ॅनालिसिस (IIASA), हायडेलबर्ग विद्यापीठ, व्हिएन्ना युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझनेस, हार्वर्ड विद्यापीठ, हुआझोंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आदी संस्थांतील संशोधकांनी केला आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘नेचर मेडिसिन’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. (Diabetes burdens Indian economy)

आजार नव्हे, तर आर्थिक आपत्ती…. संशोधकांनी २०२० ते २०५० या काळात २०४ देशांतील मधुमेहामुळे होणाऱ्या आर्थिक परिणामांचा अभ्यास केला. यात केवळ वैद्यकीय खर्चच नव्हे, तर कामाची उत्पादकता कमी होणे आणि रुग्णांची काळजी घेण्यासाठी लागणारा वेळ व खर्च यांचाही समावेश आहे.

या अभ्यासानुसार, जगभरात मधुमेहामुळे होणारा आर्थिक खर्च सुमारे १०.२ लाख कोटी डॉलर आहे. जो जागतिक जीडीपीच्या सुमारे ०.२ टक्के आहे. मात्र यात कुटुंबीयांकडून विनामूल्य दिल्या जाणाऱ्या सेवेचा खर्च धरलेला नाही. तोही धरल्यास, हा खर्च वाढून १५२.१ लाख कोटी डॉलरपर्यंत जाऊ शकतो, म्हणजेच जागतिक जीडीपीच्या सुमारे १.७ टक्के.

महत्त्वाची बाब म्हणजे, मधुमेहाच्या एकूण आर्थिक बोजापैकी ८५ ते ९० टक्के भार हा कुटुंबीयांकडून दिल्या जाणाऱ्या अनौपचारिक सेवेचा आहे. कारण अनेकांना हा आजार घेऊन दीर्घकाळ जगावे लागते. (Diabetes burdens Indian economy)

भारतावर इतका मोठा बोजा का?…. या अभ्यासातील संशोधक आणि व्हिएन्ना विद्यापीठाचे अर्थतज्ज्ञ क्लॉस प्रेटनर यांच्या मते, रुग्णांची काळजी घेणारे अनेक लोक पूर्णवेळ किंवा अर्धवेळ नोकरी सोडतात.  त्यामुळे आर्थिक नुकसान आणखी वाढते.भारत आणि चीनमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण असणे हे या दोन देशांवरील आर्थिक बोजाचे मुख्य कारण आहे. तर अमेरिकेत उपचारांचा प्रचंड खर्च आणि संसाधनांची नासाडी मोठ्या प्रमाणावर होते.

अभ्यासातून श्रीमंत आणि गरीब देशांमधील फरकही स्पष्ट होतो. उच्च उत्पन्न असलेल्या देशांत उपचारांचा खर्च एकूण बोजाच्या ४१ टक्के, तर कमी उत्पन्न देशांत तो केवळ १४  टक्के आहे. याचा अर्थ गरीब देशांत अनेक रुग्णांना उपचारच मिळत नाहीत. (Diabetes burdens Indian economy)

कर्करोग आणि अल्झायमरपेक्षाही मोठा धोका… अभ्यासात असेही नमूद करण्यात आले आहे की, मधुमेहाचा आर्थिक परिणाम कर्करोग, डिमेन्शिया किंवा अल्झायमरपेक्षाही अधिक गंभीर आहे. त्यामुळे तो जगातील सर्वात महागड्या आणि गंभीर दीर्घकालीन आजारांपैकी एक ठरत आहे.

संशोधकांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, मधुमेह रोखण्यासाठी आणि त्याचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली सर्वात प्रभावी उपाय आहे. नियमित व्यायाम आणि संतुलित आहारामुळे या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. तसेच, आजाराची लवकर ओळख, व्यापक तपासणी, जलद निदान आणि वेळेवर उपचार अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे गुंतागुंत कमी होईल आणि दीर्घकालीन खर्चही आटोक्यात येईल.संशोधकांच्या मते, हे उपाय आरोग्य आणि आर्थिक नुकसान दोन्ही कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

(सेंटर फॉऱ सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या डाऊन टू अर्थवरून साभार)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00