Home » Blog » Demand for CM resignation from Sule : सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Demand for CM resignation from Sule : सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

by प्रतिनिधी
0 comments
Demand for CM resignation from Sule

मुंबई : प्रतिनिधी : आझाद मैदानात सुरू असलेल्या मनोज जरांगेच्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी त्यांनी निर्जळी उपोषण सुरू केले आहे. जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील लोक येत असल्याने मुंबईत आठवड्याच्या पहिल्या दिवशी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. सरकारकडून वेगाने पावले उचलत नसल्याने विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (Demand for CM resignation from Sule)

राज्य सरकारावर टीका करताना सुप्रिया सुळे यांनी मुंबईत गणेशोत्सव काळात आंदोलन होणार यांची मुख्यमंत्री फडणवीस यांना माहिती हाती. त्यानंतर त्यांनी काही केले नाही असा आरोप सुळे यांनी केला आहे. आज आंदोलनस्थळी जर काही घडत असेल तर त्याला राज्य सरकार आणि गृहविभाग जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांचे इंटेलिजन्स काय करत आहे असा सवाल खासदार सुळे यांनी केला. मराठा आरक्षण आंदोलन जर सांभाळता येत नसेल, कायदा व सुव्यवस्था राखता येत नाही तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुळे यांनी केली. (Demand for CM resignation from Sule)

घोषणाबाजी करुन आरक्षण मिळणार नाही : मंत्री विखे पाटील

आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मुंबईतील आझाद मैदाना येथील उपोषणापूर्वी मराठा समाजाचे आरक्षणासाठी महाराष्ट्रात 58 मोर्चे निघाले. लाखोंच्या संख्येने हे मोर्चे निघाले होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे मोर्चे निघाले होते. या मोर्चांच्या शिस्तबद्धपणाचे जगभरातून कौतूक झाले. मात्र आता जे आंदोलन सुरु आहे, जे लोक रस्ते अडवत आहेत. शेअर मार्केटसमोर जाऊन घोषणा देत आहेत. घोषणाबाजी करुन आरक्षण मिळणार नाही. मराठा आरक्षण आंदोलकांनी शांततेत आझाद मैदानात जाऊन बसले पाहिजे. मराठा आरक्षण आंदोलक आझाद मैदानावर एकत्र येत असतील त्यात काही गैर नाही, मात्र मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत करणं हे काही बरोबर नाही, असे विखे पाटील म्हणाले. (Demand for CM resignation from Sule)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00