Home » Blog » चीन सीमेवर काय झाले हे देशाला समजले पाहिजे : हर्षवर्धन सपकाळ

चीन सीमेवर काय झाले हे देशाला समजले पाहिजे : हर्षवर्धन सपकाळ

by प्रतिनिधी
0 comments
Country needs to know what happened on the Chinese border

जमीर काझी :  मुंबई : चीनच्या सीमेवरील कारवायांबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अत्यंत महत्वाचे व गंभीर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला.  परंतु मोदी सरकार मात्र त्यांना बोलू देत नाही. भारत सरकार चीन प्रश्नी काहीतरी सत्य लपवत आहे म्हणून विरोधी पक्ष नेत्यालाही संसदेत बोलू दिले जात नाही हे अत्यंत निषेधार्ह असून मोदी सरकार संसदेच्या सर्व संकेत, परंपरा व नियम पायदळी तुडवत हुकूमशाही पद्धतीने वागत आहे, असा आरोप  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी त्यांच्या ‘फोर स्टाफ ॲाफ डेस्टिनी’ या पुस्तकात ‘डंके की चोट पर’ चीन प्रकरणावर लिहिले असून मोदी सरकारने जाबबादारी झटकल्याचे उघड आहे, हाच मुद्दा राहुल गांधी लोकसभेत मांडत होते. चीन प्रश्नावर संसदेत चर्चा व्हायला पाहिजे व चीन सीमेवर काय झाले, हे जाणून घेण्याचा अधिकार भारत मातेच्या सर्व सुपुत्रांना आहे, पण सरकार मात्र विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलूच देत नाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही चीनने भारताच्या हद्दीत प्रवेश केल्याचा मुद्दा मांडला असता मोदी सरकारने त्यांना जेलमध्ये टाकल्याचेही सपकाळ यांनी सांगितले. (Country needs to know what happened on the Chinese border)

 विमान अपघातावर संशय … उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात असल्याचे सांगून सपकाळ म्हणाले की,” त्यांचे शेवटचे संभाषण व्हायरल झाले आहे पण ब्लॅकबॉक्स मधील संभाषण अद्याप जाहीर झालेले नाही व चौकशीही होत नाही, हा विलंब अनाकलनीय आहे, मात्र प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री  फडणवीसांनी घेतलेली नाही. शपथविधीला जेवढी घाई केली तेवढी अपघाताच्या चौकशीसाठी करण्यात आली नाही.जोपर्यंत या अपघाताचा कार्यकारणभाव स्पष्ट होत नाही तोपर्यंत असे प्रश्न उपस्थित होतच राहणार. या अपघाताने अनेक प्रश्न अनुत्तरीत असल्याचे त्यांनी सांगितले . (Country needs to know what happened on the Chinese border)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00