Home » Blog » Goliwade : बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्य ठार ; तपासाचे मोठे आव्हान

Goliwade : बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्य ठार ; तपासाचे मोठे आव्हान

by प्रतिनिधी
0 comments
Goliwade

कोल्हापूर : प्रतिनिधी : शाहूवाडी तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्य ठार झाले. निनू यशवंत कंक (वय ७५), रघुबाई कंक (६५, दोघे रा. गोळीवडे, ता. शाहूवाडी)  असे दांपत्याचे नाव आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार ही घटना शुक्रवारी १७ ऑक्टोबरला झाली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. घटनेला ७२ तास उलटून गेले असल्याने तपासाचे गुढ वाढू लागले आहे. वन्य प्राण्याच्या हल्ला की घातपात या दृष्टीने पोलिस प्रशासन आणि वन खाते संयुक्तरित्या तपास करत आहेत. (Goliwade)

कंक दांपत्याचा बकरी पालनातून चरितार्थ

परळी निनाई येथील कडवी मध्यम प्रकल्पामुळे विस्थापित झालेले कंक कुटुंबाचे गोळीवणे वसाहतीत घर आहे. तिथे कुटुंबातील अन्य सदस्य राहतात. निनु कंक आणि त्यांची पत्नी रखुबाई हे पंचवीस वर्षापासून धरणाशेजारी पाल टाकन राहतात. हे दांपत्य बकरी पालनातून कुटुंबाचा चरितार्थ करतात. पालाच्या शेजारी २५ बकऱ्यांचा गोठा आहे. बकऱ्यांच्या सरंक्षणासाठी चार कुत्रीही आहेत. (Goliwade)

मुलगा सुरेश दिसले आईवडीलांचे मृतदेह

रविवारी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात कंक दांपत्य ठार झाल्याचे निदर्शनास आले. रघुबाई यांचा मृतदेह चेहरा, डावा पाच, उजवा हात तोडलेल्या अवस्थेत होता. तर निनू यांचा मृतदेह पालापासून ५० मीटर जलाशयाच्या अंतरावर पडला होता. त्यांची पांढरी टोपी रक्ताने माखलेली होती. त्यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर जखमा आढळल्या. रविवारी सकाळी त्याचा मुलगा सुरेश दीपावलीला आई वडिलांना घरी येण्यास सांगण्यास गेला असताना आई वडील रक्ताच्या थारोळ्यात आढळले. घटनास्थळी शाहूवाडी पोलिस आणि वनखात्यांच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि परिसराची पाहणी केली. (Goliwade)

तपासाचे गुढ वाढले

 वन्यप्राण्याच्या हल्ल्यात कंक दांपत्याचा मृत्यू झाला असल्याचा दावा केला असला तरी वनखात्याला परिसरात वन्य प्राण्याचा वावर असले पायाचे ठसे, प्राण्यांचे केस दिसून आलेले नाहीत. दरम्यान सीपीआरमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेह डी कंपोज झाल्याने कंक दांपत्यांचा मृत्यू शुक्रवारी रात्री झाला असावा असे अहवालात म्हटले आहे. याबाबत शाहूवाडीचे डीवायएसपी आप्पासाहेब पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मयताच्या शरीरावर हल्ल्याच्या खुणा आहेत. पण त्या वनप्राण्यांच्या आहेत की नाही याबाबत स्पष्टता शवविच्छेदन अहवालात दिलेली नाही. कंक दांपत्यावर वाघ, अस्वल, बिबट्याचा हल्ला झाला आहे याचाही वनखाते आणि पोलिस तपास करत आहेत. चोरी, जबरी चोरी, दरोडयाच्या खुणा परिसरात दिसत नाहीत. यामुळे  तपासाचे गुढ वाढले आहेत. पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. (Goliwade)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00