Home » Blog » बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; शरद पवारांची शिष्टाई

बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; शरद पवारांची शिष्टाई

by प्रतिनिधी
0 comments
Congress withdraws from Baramati by-election

पुणे : प्रतिनिधी : बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसने माघार घेतली. शरद पवारांनी केलेल्या शिष्टाईमुळे काँग्रेसने माघार घेतल्याची चर्चा आहे. पवारांनी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना फोन करुन काँग्रेसने माघार घ्यावी अशी विनंती केल्यानंतर त्यांनी मान्यता दिली. खर्गे यांच्या आदेशानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस उमेदवार माघार घेत असल्याचे जाहीर केले. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात २३  उमेदवार असल्याने बिनविरोध निवडीचे प्रयत्न निष्फळ ठरले. (Congress withdraws from Baramati by-election)

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक २३ एप्रिलला होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीत बारामतीची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला असूनही पोटनिवडणूक लढणार नसल्याचे पक्षाने जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसकडून मोरे यांनी अर्ज भरला. काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी स्वत: सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना फोन केले. त्यातच अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला आहे अशी टीका केल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर तीव्र शब्दात टीका करत निवडणूक लढण्याचा निर्धार केला. (Congress withdraws from Baramati by-election)

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसची मनधरणी सुरू होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सपकाळ यांच्याशी संपर्क साधला होता. आमदार रोहित पवार यांनी मुंबईत सपकाळ यांची भेट घेऊन पार्थ पवारांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत निवडणूकीतून माघार घेण्याची विनंती केली. दिल्लीतही माघारीसाठी घडामोडी सुरू झाल्या. शरद पवारांनी थट मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. त्यानंतर काँग्रेसने माघरीची घोषणा केली. (Congress withdraws from Baramati by-election)

काँग्रेसने माघार घेतली नसली तरी २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे, साताऱ्यातील अभिजीत बिचुकले यांचा समावेश आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00