Home » Blog » Congress-BJP together in Jaysingpur Municipality : जयसिंगपूर नगरपालिकेत काँग्रेस-भाजप एकत्र

Congress-BJP together in Jaysingpur Municipality : जयसिंगपूर नगरपालिकेत काँग्रेस-भाजप एकत्र

by प्रतिनिधी
0 comments
Congress-BJP together in Jaysingpur Municipality

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर नगरपालिकेत काँग्रेस आणि भाजप एकत्र आले आहेत. दोन्ही पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शिरोळ तालुका विकास आघाडीमध्ये सहभागी झाले आहेत. वैशिष्ट्य म्हणजे या आघाडीने आप पक्षाचा उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा देऊन निवडणुकीपूर्वी षटकार मारला आहे. (Congress-BJP together in Jaysingpur Municipality)

तंबाखूची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या जयसिंगपूर आता व्यापारी शहर म्हणून झपाट्याने उदयास येत आहे. राजर्षी शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षापूर्वी त्यांचे जनक वडील जयसिंगराव घाटगे यांच्या नावाने जयसिंगपूर शहराची उभारणी केली. त्याकाळात तंबाखूची मोठी उलाढाल होत असे. या शहरातील नगरपालिकेवर झेंडा फडकावण्यासाठी अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राजर्षी शाहू आघाडी स्थापन केली आहे. आमदार यड्रावकर सध्या शिवसेना शिंदे गटाशी जवळीक साधून आहेत. त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. (Congress-BJP together in Jaysingpur Municipality)

यड्रावकरांना रोखण्यासाठी माजी खासदार शेट्टी आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी शिरोळ तालुका विकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढवत आहेत. या आघाडीत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर आणि भाजपचेच गुरुदत्त शुगरचे माधवराव घाटगेही सहभागी झाले आहेत. त्यामुळे या आघाडीत काँग्रेस आणि भाजप सहभागी झाल्याने भुवया उंचावल्या आहेत. आघाडीच्या प्रचारासाठी आमदार सतेज पाटील आणि भाजप खासदार धनंजय महाडिक एकत्र येणार का याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी संजय पाटील यड्रावकरांच्या विरोधात शिवाजी तालुका विकास आघाडीने आपचे उमेदवार सुदर्शन कदम यांना पाठिंबा दिला आहे.  (Congress-BJP together in Jaysingpur Municipality)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00