पथनमथिट्टा : केरळ : पहाटे तीन वाजता कोंबडा बांग देत असल्याने झोप मोड होते. त्यामुळे एका व्यक्तीने कोंबड्याविरोधातच तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे या तक्रारीची दखलही घेतली गेली. महसूल प्रशासनाने १४ दिवसांत पोल्ट्री स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत.(Complaint over Rooster)
केरळमधील पथनमथिट्टा जिल्ह्यातील पल्लीकल या निसर्गरम्य, शांत गावातील एका वादाने राज्याचे लक्ष वेधले आहे. हा वाद मालमत्ता, पैशाचा नसून पहाटे कोंबडा आरवण्यावरुन झाला आहे. राधाकृष्ण कुरुप या वृद्धाची झोप कोंबड्यांनी मोडली असल्याची तक्रार महसूल प्रशासनाकडे आली आहे. (Complaint over Rooster)
कुरुप यांचे म्हणणे आहे की, कोंबड्याच्या बांगेने त्यांची झोपमोड होत आहे. रोज पहाटे तीन वाजता त्यांच्या शेजारील अनिल कुमार यांचे कोंबडे सतत बांग देतात. त्यामुळे कुरुप यांची झोप मोडते. शांतता भंग पावते. कोंबड्यांच्या बांगेचा त्रास सहन न झाल्याने कुरुप यांनी कोंबडे पाळणाऱ्याच्या विरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अदूर महसूल कार्यालयात (आरडीओ) तक्रार केली. कोंबड्यांचा मोठा आवाज हा गंभीर त्रास असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
प्रशासनाने कुरुप यांच्या तक्रारीची दखल घेत चौकशी सुरू केली. कुरुप आणि अनिल कुमार या दोघांनाही कोंबड्याच्या बांगेच्या प्रकरणाची समोरासमोर बसून चर्चा करण्यात आली. नंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची तपासणी केली. (Complaint over Rooster)
तपासणीत असे आढळून आले की अनिल कुमार यांनी त्यांचे कोंबडे घराच्या वरच्या मजल्यावर ठेवले होते. कोंबड्याच्या आरवण्यामुळे कुरुप यांची झोप मोडते. त्यांच्या स्वास्थ्यावर परिणाम होत आहे. कुरुप यांच्या तक्रारीची नोंद घेऊन प्रशासनाने अनिल कुमार यांना कुरुप यांच्या घरापासून दूर त्यांच्या मालमत्तेच्या दक्षिणेकडील बाजूला पोल्ट्री शेड हलवण्याचे आदेश दिले आहेत. पोल्ट्री शेड हलवण्यासाठी १४ दिवसांची मुदतही दिली आहे.
हेही वाचा :
सिद्धरामय्यांविरोधात पुरावे नाहीत
कारवार नौदल तळाची माहिती पाकिस्तानला लीक
हिरोशिमापेक्षा पाचशे पट अधिक शक्तिशाली स्फोट होणार