कोल्हापूर : प्रतिनिधी : जिल्ह्यातील नेते कुमकुवत असल्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्याचा हस्तक्षेप वाढला आहे, अशी टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केली. काँग्रेस कमिटीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांमधील धुसफुस, मतभेद विसरुन महायुती गोकुळच्या निवडणुकीत एकत्र लढणार या विषयावर त्यांनी आपली मते व्यक्त केली.
आमदार सतेज पाटील म्हणाले, जिल्ह्यातील नेते कुमकुवत आहेत हे दिसत असल्याने मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप वाहत आहे या पूर्वी गोकुळमध्ये महाडिक साहेबांची सत्ता होती तेव्हा राज्यात कॉग्रेसची सत्ता होती. पण काँग्रेसच्या कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी गोकुळच्या निवडणूकीत हस्तक्षेप केला नाही. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण कधी निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचे ऐकवात नाही. जिल्हातील नेते कुमकुवत असतील तर राज्यातील नेत्यांना हस्तक्षेत करण्यास संधी मिळते असा टोलाही त्यांनी महायुतीच्या नेत्यांना मारला. (CM Intervenes in Gokul Due to Weak Leadership)
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा,सोलापूर, सांगली, कोल्हापूर हा सहकाराचा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचे लेबल लावून आम्ही गोकुळ आणि जिल्हा बँकेची पायरी चढली नाही, असे मत सतेज पाटील यांनी व्यक्त केले. गेल्या वेळच्या निवडणुकीत आम्ही सर्व नेत्यांचा सन्मान केला होता. मी स्वत: प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके, राजेश पाटील यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला होता. आता महायुतीत नेत्यांचा सन्मान होतो का दिसत नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गोकुळच्या निवडणुकीत आमचे २५ उमेदवार रिंगणात असणार असल्याचे स्पष्ट करत असून पुलाखालून बरेच पाणी वाहून जायचे आहे असेही ते म्हणाले. (CM Intervenes in Gokul Due to Weak Leadership)
मग गोकुळची बदनामी का केली
गोकुळच्या निवडणूकीत आम्ही दूध उत्पादकांना दर वाढ दिली. त्यामुळे दूध उत्पादक आमच्या बाजुने आहेत असा दावा सतेज पाटील यांनी केला. आज आमच्या भावकीचं मिटलं आहे असे दावा करणाऱ्यांनी गेले तीन महिने गोकुळची बदनामी का केली असा प्रश्न उपस्थित केला. देशभरात गोकुळचा ब्रॅड नावाजलेला असताना भावकीच्या वादातून बदनामी झाली. आता भावकीची मिटलं असा दावा केला असतानाही अजुनही एक भावकी आमचं मिटलेले नाही असं म्हणत आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (CM Intervenes in Gokul Due to Weak Leadership)