Home » Blog » भाजपकडून शिवसेनेचे मुंडकं छाटण्याचे काम : अब्दुल सत्तार  

भाजपकडून शिवसेनेचे मुंडकं छाटण्याचे काम : अब्दुल सत्तार  

by प्रतिनिधी
0 comments
Friction within the Mahayuti over Candidacies

मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे जागा वाटप निश्चित झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर महायुतीमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. संभाजीनगर, पुणे, सोलापूरच्या जागेसाठी उमेदवारी झाल्यानंतर काही ठिकाणी बंडखोरीचे संकेत मिळू लागले आहेत. तर भाजपकडून शिवसेनेचे मुंडकं छाटण्याचे काम सुरू आहे, अशी टीका शिवसेनेचे माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

विधान परिषदेसाठी भाजप ११, शिवसेना ४ तर राष्ट्रवादी २ जागा लढणार आहे. छत्रपती संभाजीनगर-जालनाची जागा भाजपकडे गेली असून तिथून भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर शिवसेनेने बंडखोरी करत आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी अचानक निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. यावर आमदार सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आधी ठाकरेंच्या शिवसेनेचे हातपाय तोडले. आमचं मुंडकच छाटण्यात येत आहे, असा संताप व्यक्त केला.  एकेकेकाळी ममता बॅनर्जी आणि भारतीय जनता पार्टी एकत्र होते. नंतर दोघांत समन्वय तुटला. आता दोघांमध्ये हाणामारीपर्यंत गोष्ट गेली आहे. भाजपकडून शिवसेनेची ‘ममता’ होऊ नये, हीच अपेक्षा आहे. एकनाथ शिंदे हे शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दलित, पीडित आणि सगळ्या जातींना घेऊन जाणारे आहेत. त्यामुळे ममता होणे शक्य नाही. पण, होणार नाही, याची दक्षता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घ्यावी लागेल,” असे अब्दुल सत्तारांनी म्हटंले आहे. (Friction within the Mahayuti over Candidacies)

सोलापूरमध्ये भाजपने बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिल्याने पंढरपुरचे माजी आमदार प्रशांत परिचारक नाराज झाले. राऊतांचा अर्ज भरताना परिचारक गैरहजर राहिले. राऊतांचा उमेदवारी अर्ज भरताना पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार राजन पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी पाटील, राम सातपुते, दीपक साळुंखे, दिलीप माने उपस्थित होते.

पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली असून तिथे विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या सुनील टिगरे यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. टिगरे काकडे यांच्यासाठी माघार घेतील असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. (Friction within the Mahayuti over Candidacies)

महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरलेल्यांची नावे अशी

भाजप – वर्धा चंद्रपूर गडचिरोली : अरुण लखाणी. भंडारा गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर, अमरावती : प्रवीण पोटे, सोलापूर : राजेंद्र राऊत, सांगली सातारा : धैर्यशील कदम, अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर जालना : सुहास शिरसाट, नांदेड : अमर राजूरकर, धाराशिव बीड लातूर : बसवराज पाटील, जळगाव : नंदकिशोर महाजन, नागपूर : राजीव पोतदार.

शिवसेना – ठाणे : रवींद्र फाटक, नाशिक : नरेंद्र दराडे, परभणी हिंगोली : सईद खान, यवतमाळ : दुष्यत चतुर्वेदी.

राष्ट्रवादी काँग्रेस – रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे, पुण विक्रम काकडे, सुनील टिंगरे. (Friction within the Mahayuti over Candidacies)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00