Home » Blog » Chhaava housfull : ‘छावा’ने पहिल्याच दिवशी कमावले १९ कोटी

Chhaava housfull : ‘छावा’ने पहिल्याच दिवशी कमावले १९ कोटी

विकी कौशलच्या अभिनयाला रसिकांची दाद

by प्रतिनिधी
0 comments
Chhaava housfull

मुंबई : प्रतिनिधी : मुघल साम्राज्याविरोधात प्राणपणाने लढा देऊन स्वत:चे बलिदान देणारे छत्रपती संभाजीराजे यांच्या पराक्रमी, शौर्यगाथेवरील चित्रपट छावा शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) भारतभर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पहिल्याच दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत चित्रपटाने उत्पन्नाचा १९ कोटींचा टप्पा गाठला. अभिनेता विकी कौशल याने साकारलेली छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका चित्रपट रसिकांना चांगलीच भावली आहे. त्याने महाराजांच्या भूमिकेला चांगला न्याय दिल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. (Chhaava housfull)

छावा चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. महाराणी येसुबाईच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी अडव्हॉन्स बुकिंगमध्ये १७ कोटींची कमाई केली. तरुणाईने हा सिनेमा ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी पहायला पसंती दिली. मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीनमध्ये छावा प्रदर्शित झाला असून चित्रपटगृहात ‘हरहर महादेव’च्या घोषणाही घुमल्या. (Chhaava housfull)

कोल्हापूर शहरात आयनॉक्ससह सिंगल स्क्रीनवर छावा चित्रपट प्रदर्शित झाला. शुक्रवारी सकाळपासून थिएटरबाहेर गर्दी होती. शहरातील प्रभात चित्रपटागृहाबाहेर सिंहाच्या जबड्यात हात घातलेले छत्रपती संभाजीराजेंचे कटआऊट लावले होते. अनेक प्रेक्षक भगवे फेटे परिधान करुन आले होते. प्रत्येक शोवेळी चित्रपटगृहासमोर गर्दी पहायला मिळाली. नागपूरमध्ये एक युवक चक्क संभाजीराजे यांची वेषभूषा साकारुन घोड्यावरुन सिनेमा पाहण्यासाठी आला होता.

बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाने जबरदस्त कलेक्शन केल्याने या वर्षी हा चित्रपट ब्लॉकबस्टर चित्रपट ठरु शकतो. २०२५ या वर्षी वर्षाच्या प्रारंभी ‘इमर्जन्सी’ आणि ‘आझाद’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन अडीच कोटी आणि दीड कोटी रुपये होते. यानंतर ‘स्काय फोर्स’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.२५ कोटी आणि ‘देवा’ने साडेपाच कोटी रुपयांची कमाई केली. ‘लवायपा’ आणि ‘बदास रविकुमार’ या चित्रपटांनीही पहिल्या दिवशी सव्वा कोटी आणि पावणेतीन कोटी रुपयांची कमाई केली. तर नागा चैतन्यच्या ‘थंडेल’ या चित्रपटानेही पहिल्या दिवशी ११.५ कोटींची कमाई केली. (Chhaava housfull)

पण ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांमध्ये या चित्रपटाने या सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल बोलायचे झाले तर, सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने आधीच १७.८९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत या चित्रपटाने उत्पन्नाचा १९ कोटींचा टप्पा ओलांडला होता.

हेही वाचा :

प्रतीक-प्रिया लग्नबंधनात
बोराडे नावाचे साहित्य शिवार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00