Home » Blog » Chavan’s statement regarding the alliance : दोन डिसेंबरपर्यंत मला युती टिकवायची आहे : रवींद्र चव्हाण

Chavan’s statement regarding the alliance : दोन डिसेंबरपर्यंत मला युती टिकवायची आहे : रवींद्र चव्हाण

by प्रतिनिधी
0 comments
Chavan's statement regarding the alliance

जळगाव : मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. त्यामुळे मी यावर काहीही बोलणार नाही. मी नंतर यावर भाष्य करेन’ असे सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी केलेल्या आरोपाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर उत्तर दिले. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी चव्हाण जळगाव दौऱ्यावर आले होते. रवींद्र चव्हाण यांनी असे वक्तव्य केल्यानंतर नगरपालिका, नगरपंचायतीचा निकाल लागल्यानंतर महायुती कायम राहणार की बेबनाव होणार हे स्पष्ट होणार आहे. (Chavan’s statement regarding the alliance)

कोकणात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात वाद पेटला आहे. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी बुधवारी भाजपचे पदाधिकारी किनवडेकर यांच्या राहत्या घरी स्टिंग ऑपेशन केले होते. त्यावेळी त्यांच्या घरी २५ लाख रुपये सापडले होते. या घटनेनंतर निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात, तेव्हा वेगळे वातावरण निर्माण होते. चव्हाण काल जिल्ह्यात आले होते, त्यामुळे मला थोडा संशय आला. ते असेच सहज आलेले नाहीत अशी टीका केली होती. भाजपकडून पैसे वाटले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केली होता.  (Chavan’s statement regarding the alliance)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00