नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (२३ एप्रिल) लष्कर-ए-तोयबाच्या चार दहशतवाद्यांच्या एका गटाने पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या भ्याड कृत्यात दोघा स्थानिक नागरिकांचा समावेश होता. त्यांच्याकडे एके-४७ रायफल्स होत्या. त्यांनी बॉडी कॅमेरे घातलेले होते. त्यांनी पर्यटकांमधील हिंदूंना वेगळे करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, असे वृत्त ‘द प्रिंट’ने दिले आहे. (Two locals identified)
या दोघा स्थानिकांची ओळख पटली आहे. सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांच्या माहितीनुसार, बिजबेहरा येथील आदिल ठाकूर आणि त्राल येथील आसिफ शेख अशी या दोघांची नावे आहेत.
सूत्रांनी सांगितले की, हे दोन्ही पाकिस्तानी दहशतवादी पश्तून पार्श्वभूमीचे असल्याचे दिसून येते.
या हल्ल्याची जबाबादारी द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने जबाबदारी स्वीकारली असली तरी, हल्ल्यात सहभागी असलेले चारही दहशतवादी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाचे आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले. टीआरएफने सांगितले की, ते लष्कर-ए-तोयबाचे एक पथक आहे. हा गट स्थानिक जबाबदारी पार पाडतो. (Two locals identified)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १९ एप्रिल रोजीच्या कटरा दौऱ्यादरम्यान हल्ला करण्याची त्यांची मूळ योजना होती, जी नंतर रद्द करण्यात आली, असेही मानण्यात येते.
हा हल्ला कोणत्याही गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या गटाला लक्ष्य करण्यासाठी होता, ही शक्यता सूत्रांनी फेटाळून लावली. गुप्तचर विभागाचा एक कर्मचारी कुटुंबासह सुट्टीवर आला होता. तो मारला गेला होता.
हे चार दहशतवादी बॉडी कॅमेरे आणि एके-४७ रायफल्सने सज्ज होऊन बैसरनच्या मैदानी भागात आले होते, असे समजते.
दहशतवाद्यांनी नावे विचारली, त्या आणि इतर ओळखीच्या वैशिष्ट्यांवरून हिंदू पुरुषांना वेगळे केले. दोन पुरुषांनी त्यांची धार्मिक ओळख लपवण्याचा प्रयत्न केला, तथापि त्यांना हल्लेखोरांनी ओळखले, असे समजते.
नागरिकांना मारण्याआधी महिला आणि मुलांना बाजूला करण्यात आले.
त्यानंतर चार दहशतवाद्यांच्या गटाने पुरुषांवर गोळीबार केला आणि ते परिसरातून पळून गेले. घटनास्थळी सापडलेल्या गोळ्या एके ४७ च्या आहेत. त्यांना चिलखती गोळ्या किंवा स्टील बुलेट असेही म्हटले जाते. (Two locals identified)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैसरनच्या मैदानात दहशतवाद्यांनी सुमारे १५ मिनिटे गोळीबार केला.
पर्वतकड्यावर अधिक दहशतवादी उपस्थित आहेत का असे विचारले असता, सूत्रांनी सांगितले की शक्यतो सहाजणांच्या गटात ते असतात. त्यातील एक किंवा दोन जण पाळत ठेवत असण्याची शक्यता आहे.
गुप्तचरांकडून सूचना मिळाली होती
सूत्रांच्या माहितीनुसार, जवळपासच्या भागात दहशतवादी दिसल्याची गुप्तचरांची माहिती होती, परंतु काहींनी ती माहिती गुप्तचर संस्थांकडून महत्त्वाच्या घटनांबाबत पाठवल्या जाणाऱ्या नियमित सूचना म्हणून फेटाळून लावली. (Two locals identified)
पर्यटकांची संख्या जास्त असूनही आणि सध्या सुरू असलेल्या पर्यटन हंगामात या भागात सुरक्षा दल का तैनात केले गेले नाही असे विचारले असता, सूत्रांनी सांगितले की त्यांना पर्यटकांवर हल्ला होण्याची अपेक्षा नव्हती. कारण अशा घटनांमुळे स्थानिकांचेही नुकसान होते. त्यांनी असेही म्हटले की अधिकाऱ्यांचा उद्देश बंदुका घेऊन सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांचे स्वागत करण्याऐवजी हा परिसर सुरक्षित क्षेत्र असल्याचा विश्वास देणे होता.
हेही वाचा :
दहशतवाद, धर्म आणि राजकारण
जगभरातून दहशतवादी हल्ल्याचा निषेध
अमित शहा अपयशी गृहमंत्री