Home » Blog » Five pilgrim’s succumbed: पाच भाविक महिलांचा मृत्यू

Five pilgrim’s succumbed: पाच भाविक महिलांचा मृत्यू

महाराष्ट्रातील तिघींचा समावेश; पायलटही ठार

0 comments
Five pilgrim's succumbed

उत्तरकाशी : उत्तराखंडमध्ये गुरुवारी (८ मे) सकाळी हेलिकॉप्टर कोसळून पाच महिला भाविकांसह पायलटचा मृत्यू झाला. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील भागीरथी नदीजवळ ही दुर्घटना घडली. भाविकांना घेऊन हे खाजगी हेलिकॉप्टर येत होते. अपघातात एकाला गंभीर दुखापत झाली. मृतांमध्ये महाराष्ट्रातील तीन आणि उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेशातील प्रत्येकी एका महिलेचा समावेश आहे.(Five pilgrim’s succumbed)

विजयालक्ष्मी रेड्डी सी, रुची अग्रवाल, कला चंद्रकांत सोनी, तिघी रा. महाराष्ट्र, राधा अग्रवाल, ७९, उत्तर प्रदेश आणि वेदांती आंध्र प्रदेश अशी मृतांची नावे आहेत. कॅप्टन रॉबिन सिंग असे पायलटचे नाव आहे. (Five pilgrim’s succumbed)

आंध्र प्रदेशातील मक्तूर भास्कर यांची प्रकृती गंभीर आहे.

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या म्हणण्यानुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर एरोट्रान्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे ​​होते. हे हेलिकॉप्टर यमुनोत्री मंदिराच्या दर्शनानंतर गंगोत्री मंदिराकडे निघाले होते. ते हर्षिल हेलिपॅडवर उतरणार होते. तत्पूर्वीच ते अपघाग्रस्त झाले. ते सुमारे २००-२५० मीटर खोल दरीत कोसळले. घटनेनंतर एसडीआरएफने लगेचच बचाव कार्य सुरू केले परंतु पाच जणांचा मृत्यू झाला तर पायलटचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले.

‘‘उत्तरकाशीतील गंगनानीजवळ हेलिकॉप्टर अपघातात काही जणांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद बातमी मिळाली आहे. … मृतांच्या आत्म्यांना शांती मिळो आणि शोकाकुल कुटुंबांना हे प्रचंड दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी मी प्रार्थना करतो,’’ असे श्री धामी यांनी म्हटले आहे. (Five pilgrim’s succumbed)

जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आणि अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

‘‘या प्रकरणाबाबत मी अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहे आणि प्रत्येक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे,’’ असे त्यांनी पुढे सांगितले.

राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांनी माहिती दिली की विमान अपघात तपास ब्युरो हे हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी करेल. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे विमान अपघात तपास ब्युरो हे भारतीय हवाई क्षेत्रात विमाने चालवताना होणाऱ्या सुरक्षिततेच्या घटनांचे अपघात, गंभीर घटनांची तपासणी करते. या अपघातानंतर केदारनाथमधील हेलिकॉप्टर सेवा देखील थांबवण्यात आली.

हेही वाचा :
ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० दहशतवादी ठार
लाहोरमधील स्फोटांनी पाकिस्तान हादरलं

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00