लंडन : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी क्रिकेट स्पर्धेत तेंडूलकर अँडरसन क्रिकेट ट्रॉफीमधील अखेरच्या पाचव्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना भारताने ३ बाद ८५ धावा केल्या. भारताची सलामीची जोडी के.एल. राहूल, यशस्वी जैयस्वाल बाद झाल्यानंतर उपाहारापूर्वीच जोरदार पावसाच्या सरी आल्याने दोन तास खेळ थांबला. त्यानंतर खेळ सुरू झाल्यावर कर्णधार शुभमन गिल धावबाद झाल्याने भारताला तिसरा धक्का बसला. त्यानंतर परत पाऊस आल्याने खेळ थांबवण्यात आला आहे. (Gill run out)
अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघात तीन बदल झाले आहेत. यष्टीरक्षक ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर आणि जसप्रित बुमराहच्या जागी ध्रुव जुरेल, करुण नायर आणि प्रसिद्ध कृष्णाला संघात संधी मिळाली आहे. इंग्लंड संघाच्या कर्णधाराची धुरा ऑली पोप सांभाळत असून त्यांनी तीन नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. बेन स्टोक्स, लियाम डॉसन, ब्रायडन कार्स आणि जोफ्रा आर्चर याच्या जागी जेकब बॅथल, जेमी ओव्हरटन, गस अटकिन्सन, जोश टोंगे यांचा संघात समावेश झाला आहे. (Gill run out)
इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.ढगाळ वातावरण आणि पावसाळी वातावरणाचा फायदा उठवण्याचा इंग्लंडच्या गोलंदाजांनी प्रयत्न केला. चौथ्या षटकात पहिल्याच चेंडूवर गस अटकिन्सचा चेंडू जैसवालच्या पायावर आदळला. इंग्लंडच्या खेळाडूंनी जोरदार अपिल केले. रेव्हू मध्ये तो बाद ठरला. त्याने २ धावा केल्या. भारताची स्थिती १ बाद १० अशी होती. त्यानंतर के.एल. राहूल आणि साई सुदर्शन मैदानावर होते. राहूल अतिशय सावधपणे खेळत होता. इंग्लंडच्या गोलंदाजांचे चेंडू तो सोडत होता. पण सोळाव्या षटकात ख्रिस वोक्सच्या एका चेंडू राहूलच्या बॅटला लागून चेंडू यष्टीवर आदळला. राहूलने १४ धावा केल्या. (Gill run out)
राहूल बाद झाल्यावर कर्णधार शुभमन गिल मैदानात उतरला. दोघांनी काही काळ किल्ला लढवला. उपाहारापूर्वीच पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यामुळे दोन तास खेळ झाला नाही. त्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला. कर्णधार गिल मैदानावर टिकणार असे वाटत असताना धावबाद झाला. धाव घेण्यासाठी शुभमन गिल धावला पण परत क्रीझमध्ये परतत असताना घसरला. या संधीचा फायदा घेणारया गस अटकिन्सच्या अचूक फेकीवर तो धावचित झाला. त्याने २१ धावा केल्या. त्यामध्ये चार चौकार मारले. दुसऱ्या बाजूला साई सुदर्शन २४ धावांवर खेळत आहे. भारताची स्थिती ३ बाद ८३ अशी होती. गिल बाद झाल्यानंतर करुण नायर मैदानात आला. पण त्यानंतर पुन्हा पाऊस आल्याने खेळ थांबला. (Gill run out)
