`धुरंधर 2: द रिव्हेंज` या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. या चित्रपटाबाबत रसिकांची उलटसुलट मते असली तरी चित्रपटाची कमाई मात्र कोटींची उड्डाणे घेत आहे.
दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या या स्पाय-अॅक्शन चित्रपटाने पहिल्याच विकेंडमध्ये ६९१.३२ कोटींची जागतिक कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या हिट्सपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. (‘Dhurandhar 2’ Sets New Box Office Records)
भारतातील कमाई (बॉक्स ऑफिस कलेक्शन)
रविवारी भारतात ११४.८५ कोटी रुपये नेट कमाई
एकूण भारतातील कमाई: ४५४,१२ कोटी रुपये
थिएटरमध्ये प्रेक्षकांची उपस्थिती): ७९.७ टक्के
परदेशात (Overseas):
आतापर्यंत कमाई: १४९.३५ कोटी रुपये.
भाषेनुसार कमाई (रविवार):
हिंदी: १०७ कोटी, तेलुगू: ५.२५ कोटी, तमिळ: २.५० कोटी, मल्याळम: ९० लाख आणि कन्नड: १० लाख रुपये. म्हणजेच, चित्रपटाची मुख्य कमाई हिंदी आवृत्तीमधूनच होत आहे.
इतर चित्रपटांशी तुलना
`धुरंधर 2` ने पहिल्या शनिवार-रविवारी मिळून २२७.८५ कोटी कमावले. बाहुबलीने १८३ कोटी, तर केजीएफ 2 ने १७३.६५ कोटी कमावले. या तुलनेत २६०.३ कोटी कमावणरा `पुष्पा 2: द रुल` पहिल्या क्रमांकावर आहे.
धुरंधर 2 ने मोडलेले विक्रम
धुरंधर 2 ने सर्वात मोठी हिंदी ओपनिंग दिली. रिलीजच्या आधीच ४३ कोटी (paid preview), तर पहिल्या दिवशी भारतात १०२.५५ कोटी कमाई केली. हिंदी आवृत्तीने ९९.१०कोटींचा नवा विक्रम नोंदवला. (‘Dhurandhar 2’ Sets New Box Office)
एका दिवसात शंभऱ कोटी
ज्या दिवशी धुरंधर 2 प्रदर्शित झाला, त्या एका दिवसात शंभऱ कोटी कमावले असून एका दिवसात सर्वाधिक कमावणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला. शनिवारीही एका भाषेत शंभऱ कोटी कमावले. शनिवारी ११३ कोटी णि रविवारी ११४.८५ कोटी असे सलग दोन दिवस शंभर कोटी ओलांडणारा चित्रपट ठऱला आहे.
सर्वात जलद ५००
सर्वात जलद ५०० कोटी पार करणारा भारतीय चित्रपट ठऱला असून रविवारीच त्याने पाचशे कोटींचा आकडा पार केला. दंगल चित्रपटाने ३८७ कोटी तर बाहुबली चित्रपटाने ४२१ कोटी कमावले होते, या दोन्ही चित्रपटांना धुरंधर 2 ने मागे टाकले आहे. रजनीकांतच्या 2.0 (६९१ कोटी) आणि सनी देओलच्या गदर 2 (६८९ कोटी) या चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. आता फक्त आमीर खानचा पीके (७९२ कोटी) हा धुरंधर 2 च्या पुढे आहे. (‘Dhurandhar 2’ Sets New Box Office Records)