बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज मंगळवारी (२२ जुलै) न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाने कराडच्या संपत्ती अर्जावर राखून ठेवला. (Karad’s application rejected)
बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावताना या प्रकरणाची सुनावणी ४ ऑगस्टला ठेवली.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात कराड आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या सुनावणीवेळी कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आणि संपत्ती जप्तीबाबत युक्तिवाद झाला होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्याला जोरदार विरोध केला. त्यावेळी दोन्हीकडचे युक्तिवाद ऐकून घेत निर्णय राखून ठवेला होता. आजच्या सुनावणीवेळी कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. संपत्ती अर्जावरील निर्णय मात्र राखून ठेवला आहे. (Karad’s application rejected)
सुनावणीची उज्जवल निकम यांनी दिलेली माहिती अशी, वाल्मिक कराडने संतोष देशमुखांच्या खटल्यातून मला दोषमुक्त करावे, अशी मागणी करणारा अर्ज दिला होता. तो न्यायालयाने फेटाळला. दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावे दोषमुक्त करावे अशा प्रकारे अर्ज केला. तसेच वाल्मिक कराडने जामिनावर मुक्तता करावी असाही अर्ज केला. त्याला आम्ही विरोध केला आहे. (Karad’s application rejected)
दरम्यान, वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी सांगितले. संपत्ती जप्तीबाबत दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाला. आम्ही जे बँक खाते गोठवण्यात आले त्यावरील निर्बंध उठविण्याबाबत बाजू मांडली. याबाबत सुनावणी झाली. पुढील तारखेला याबाबत न्यायालय निर्णय देईल, असे खाडे यांनी सांगितले.
हेही वाचा :
सरकार भिकारी; कोकाटेंचे आणखी एक वादग्रस्त विधान!
६४ कोटींची लाच घेतल्याप्रकरणी चंदा कोचर दोषी