Home » Blog » Threat to Pawar fraction activist : भरणे समर्थकाकडून कार्यकर्त्याला धमकी

Threat to Pawar fraction activist : भरणे समर्थकाकडून कार्यकर्त्याला धमकी

by प्रतिनिधी
0 comments
Threat to Pawar fraction activist

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या कार्यकर्त्याला मंत्री दत्तात्रय भरणे समर्थकाकडून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. भरणे यांचे समर्थक हणुमंतराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी महारुद्र पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यासंबंधीची तक्रार खासदार सुळे यांनी पुणे पोलिसांत दिली आहे. (Threat to Pawar fraction activist)

खा. सुळे यांनी एक्सवर यासंबंधीची पोस्ट केली आहे. त्यात म्हणतात, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे समर्थक हणुमंतराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सत्तेचा पाठिंबा असल्याशिवाय या पद्धतीने सराईतासारखी जाहीर धमकी देण्याचे धाडस कोणताही जबाबदार राजकीय नेता करु शकणार नाही. महारुद्र पाटील हे एक जबाबदार पदाधिकारी आहेत. गेली अनेक वर्षे ते राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांना ‘ऑन कॅमेरा’ धमकी देण्याचे धाडस करणाऱ्या कोकाटेंवर गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. (Threat to Pawar fraction activist)
पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण यांनी कृपया या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी आणि सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

https://twitter.com/supriya_sule/status/1952225685986316637?

हेही वाचा :
सच्चा भारतीयाला हे शोभत नाही : राहुल गांधी यांना कोर्टाने फटकारले
मोदी, शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00