कोल्हापूर : प्रतिनिधी : इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स (ISSE) कोल्हापूर सेंटरच्यावतीने, कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ येथे शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आएएसएसई कोल्हापूर सेंटरचे चेअरमन प्रशांत हडकर यांनी दिली. इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व डिपार्टमेंट ऑफ अप्लाइड मेकॅनिक्स, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. (National Workshop organized by Indian Society of Structural Engineers)
इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स (ISSE) ची स्थापना २९ जानेवारी १९९७ रोजी प्रख्यात अभियंता, स्वर्गीय आर.एल. नेने यांच्या नेतृत्वाखाली दहा सल्लागार विश्वस्तांनी केली. संपूर्ण भारतात १ हजार ६८४ हून अधिक सदस्य आहेत.संस्थेच्यावतीने वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संस्थेच्यावतीने शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत सिव्हिल इंजिनिअर्स, स्ट्रक्चरल कन्सल्टंट, शिक्षणतज्ज्ञ, तसेच उद्योग तज्ञांसाठी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधील, आयएस१८९३ (पार्ट १ आणि ५) मधील प्रस्तावित सुधारणा बाबत आयआयटी रुरकी येथील प्रोफेसर योगेंद्रसिंग आणि डॉ. विजय खोसे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सुधारणेबाबत चर्चा होणार आहे. या चर्चासत्राचा लाभ प्राध्यापक, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांना होणार आहे. (National Workshop organized by Indian Society of Structural Engineers)
पत्रकार परिषदेला प्रा.महेश साळुंखे, समन्वयक, स्थापथ्य अभियांत्रिकी विभाग, शिवाजी विद्यापीठ, प्रा. सचिन कदम, विभाग प्रमुख, डिपार्टमेंट ऑफ अप्लाइड मॅकॅनिकस, वालचंद कॉलेज ऑफ ईजिनयरींग, सांगली, आयएसएसई उपाध्यक्ष मंदार आंबेकर, सेक्रेटरी जिया मोमीन, संचालक रणजीत जाधव, निरंजन वायचळ, सचिन मेहता आदी पदाधिकारी उपस्थित होते. (National Workshop organized by Indian Society of Structural Engineers)