नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणूकीतील औरंगाबाद जिल्ह्यातील कुटुंबा येथील जाहीरसभेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी उच्च जातीचा संदर्भ देत १० टक्के लोक लष्करावर नियंत्रण ठेवतात असा दावा केला. भारतातील ९० टक्के जनता सत्तेपासून लांब आहे याकडे लक्ष वेधले. राहूल गांधीच्या वक्तव्यावर भाजपने जोरदार टीका केली आहे. (Rahul Gandhi’s criticism of Nitish government)
राहूल गांधी म्हणाले, ९० टक्के लोक अत्यंत मागासलेले, मागासलेले, दलित आणि आदिवासी समुदायातून येतात. भारताच्या लोकसंख्येचा बहुसंख्य भाग सत्तेपासून आणि विशेषाधिकारांपासून मोठ्या प्रमाणात वंचित आहेत. १० टक्के लोकांकडे सर्व संपत्ती जाते. सर्व नोकऱ्या त्यांच्याकडे जातात. न्यायव्यवस्थेवर आणि सैन्यातही त्यांचे नियंत्रण आहे. तर दुसरीकडे भारताची मागासलेली, दलित, अदिवासी ९० टक्के लोकसंख्या कुठेही सापडत नाही. उपेक्षित समुदायांना नेतृत्व आणि संधी मिळण्यास पद्धतशीरपणे नकार दिला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (Rahul Gandhi’s criticism of Nitish government)
राहुल गांधी यांनी लष्कराबद्दल केलेल्या वक्तव्यावर भाजपने त्यांच्यावर प्रत्युत्तर दिले. पक्षाचे प्रवक्ते सुरेश नाखुआ यांनी एक्स वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “राहुल गांधी आता सशस्त्र दलांमध्ये जाती शोधत आहेत आणि म्हणतात की १०% लोक त्यावर नियंत्रण ठेवतात. पंतप्रधान मोदींबद्दलच्या द्वेषात त्यांनी आधीच भारताचा द्वेष करण्याची मर्यादा ओलांडली आहे.”
भाषणामध्ये बिहार सरकारच्या कारभारावरही राहूल गांधींनी हल्लाबोल केला. नितीश कुमार सरकारच्या कारभारामुळे बिहारमधील तरुणांना देशभरात कमी पगाराच्या, निकृष्ट दर्जाच्या कामात ढकलत आहे, असा आरोप केला. “बिहारमधील लोक संपूर्ण देशात अंगमेहनतीचे काम करतात. देशाच्या विविध भागात, बिहारमधील लोक मोठ्या इमारती, रस्ते, बोगदे आणि कारखाने बांधत आहेत,” असे ते म्हणाले. (Rahul Gandhi’s criticism of Nitish government)
राज्य सरकार आपल्या लोकांना अपयशी ठरत असल्याचा आरोप करत राहुल गांधी पुढे म्हणाले, ” सत्य हे आहे की नितीश कुमार यांनी येथील रोजगार नष्ट केला आहे आणि बिहारमधील लोकांना देशातील मजूर बनवले आहे.”