पटणा : बिहार विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात एनडीएकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरले असून त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहूल गांधी आणि राजदचे तेजस्वी यादव यांचे नाव न घेता टीका केली. हजारो कोटी रुपयांचे घोटाळे करणारे दोन युवराज सध्या जामिनावर बाहेर आहेत. ते मला शिव्या देतात. आपल्या गावाकडे अशा लोकांना किंमत नसते. जामिनावर घरी आलेल्या व्यक्तीला सन्मान दिला जात नाही, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. (Modi criticizes Gandhi, Tejashwi)
पंतप्रधान मोदींची आज गुरुवारी मुझफ्फराबाद येथील जाहीर सभेत राहूल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, देशातील दोन मोठ्या प्रस्थापित व भ्रष्ट कुटुंबातील युवराज मला सतत शिव्या देत असतात. गरीब घरातून व मागासवर्गीय समाजातून पुढे आलेली व्यक्ती त्यांना बघवत नाही”(Modi criticizes Gandhi, Tejashwi)
बिहार विधानसभा निवडणूकीत एनडीएच्या विरोधात राहूल गांधी आणि लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी झंझावती प्रचार सुरू केला आहे. गांधी आणि यादव यांनी मोदी आणि नीतीशकुमार यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना मोदींनी दोघांचे नाव न घेता टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, बिहार विधानसभा निवडणूकीत दोन युवकांची जोडी तयार झाली आहे. ते दोघेही स्वत:ला राजपुत्र, युवराज मानतात. दोघांनी खोटी आश्वासने देण्याची दुकाने उघडली आहेत. एक देशातील मोठ्या, प्रस्थापित राजकारणी कुटुंबाचा युवराज आहे. तर दुसरा बिहारमधील सर्वात मोठ्या प्रस्थापित राजकारणी कुटुंबाचा युवराज आहे. दोघांनी हजारो कोटींचे घोटाळे केले आहेत असा आरोप केला. (Modi criticizes Gandhi, Tejashwi)
दोन्ही युवराज मला २४ तास शिव्या देत. चहा विकणारा इथवर पोहोचलाय ते युवराजांना सहन होत नाही. दलितांना आणि मागासवर्गीयांना ते शिव्या देतात असेही मोदी म्हणाले.