अहिल्यानगर : राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी (६ मे) अहिल्यानगर येथे झाली. या बैठकीत अहिल्यानगरच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तीर्थक्षेत्रांच्या विकासांबरोबरच चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिस्थळ जतन आणि संवर्धनासाठी ६८१ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. अहिल्यानगर येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. (cabinet meeting decisions)
शिवाय याच बैठकीत राज्यातील विविध देवस्थाने आणि तीर्थस्थळांसाठी मोठा निधीही मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही मंत्रिपरिषद घेण्यात आली. बैठकीतील निर्णयांची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते. (cabinet meeting decisions)
चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळाचे जतन आणि संवर्धनासाठी ६८१ कोटींचा आराखडा मान्य करण्यात आला असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या निधीतून येथे मोठ्या प्रमाणात विकासाची कामे होतील. अखिल भारतीय स्तरावरील एक प्रेरणास्थळ आणि तीर्थस्थळ म्हणून हे स्मृतीस्थळ ओळखले जाईल, अशा प्रकारचा हा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विविध देवस्थाने आणि तीर्थस्थळांसाठी निधी
अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दीचे औचित्य साधून याच बैठकीत राज्यातील विविध देवस्थाने आणि तीर्थस्थळांसाठी ५ हजार ५०३ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यानुसार मंजूर केलेले प्रकल्प आणि निधी असा.
- अष्टविनायक गणपती मंदिर जिर्णोद्धार १४७ कोटी रुपये
- श्री क्षेत्र तुळजा भवानी मंदिर विकास आराखडा १८६५ कोटी
- श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा २५९ कोटी रुपये
- त्र्यंबकेश्वर विकास आराखडा २७५ कोटी रुपये
- श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा १४४५ कोटी रुपये
- श्री क्षेत्र माहुरगड विकास आराखडा ८२९ कोटी रुपये
अहिल्यादेवींवर बहुभाषिक चित्रपट
अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी निमित्ताने त्यांचे जीवन आणि कार्याचा परिचय संपूर्ण जगाला झाला पाहिजे, अशी राज्य सरकारची अपेक्षा आहे. त्याला अनुसरून त्यांच्या जीवनावर बहुभाषिक व्यावसायिक सिनेमा तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अहिल्यादेवींनी जे कार्य केले तेच आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून करत असल्याचा दावाही त्यांनी केला. (cabinet meeting decisions)
अहिल्यादेवींच्या नावे वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापण्याचे तसेच खास मुलींसाठी आयटीआय तयार करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवण्याचे ठरविण्याचे आल्याचे यावेळी सांगण्यात आले.