Home » Blog » Bumrah Archer : ‘लॉर्डस्’ वर रंगणार ‘बुमराह’, ‘आर्चर’ मध्ये सामना

Bumrah Archer : ‘लॉर्डस्’ वर रंगणार ‘बुमराह’, ‘आर्चर’ मध्ये सामना

by प्रतिनिधी
0 comments
Bumrah Archer

लंडन : तब्बल चार वर्षानंतर जोफ्रा आर्चरचे इंग्लंडच्या कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीला धार येणार आहे. तर दुसऱ्या कसोटी विश्रांती घेऊन जसप्रित बुमराहही भारतीय संघात येणार आहे. लॉर्डस् च्या हिरव्यागार खेळपट्टीलवर जसप्रित बुमराह आणि जोफ्रा आर्चर यांच्यात सामना पहायला मिळणार आहे. क्रिकेटची पंढरी लॉर्डस् वर गुरुवारी १० जुलैपासून भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तिसरी कसोटी सुरू होईल. (Bumrah Archer)

इंग्लंडने तिसऱ्या कसोटीसाठी अकरा जणांचा संघ जाहीर केला आहे. जोफ्रा आर्चर जोशुआ टँगची जागा घेतली जाईल. इंग्लंडमधील कौंटी सामन्यात जोफ्राने १८ षटके गोलंदाजी केली आहे. त्यानंतर त्याची दुसऱ्या कसोटीच्यावेळी इंग्लंड संघात समावेश झाला पण तो अकरा जणांमध्ये नव्हता. आता तिसऱ्या कसोटीत इंग्लंडकडून गोलंदाजी करेल. (Bumrah Archer)

दरम्यान माजी कर्णधार मायकेल वॉनने इंग्लंडला आर्चरकडून जास्त अपेक्षा करु नये असा इशारा दिला आहे. आर्चरने २०१९ ते २०२१ दरम्यान झालेल्या १३ कसोटीमध्ये ३१.०४ सरासरीने ४२ बळी मिळवले आहेत.

दरम्यान दुसऱ्या कसोटीत थांबलेला जसप्रित तिसऱ्या कसोटी भारतीय संघात स्थान मिळवले. त्यामुळे भारतीय वेगवान गोलंदाजीला आणखीन धार येईल. दुसऱ्या कसोटीत बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीप आणि मोहम्मद सिराज यांनी इंग्लंड संघास जेरीस आणले होते. बुमराह परतल्याने तो प्रसिद्ध कृष्णाची जागा घेण्याची शक्यता आहे. वॉशिग्टंन सुंदरने दुसऱ्या कसोटीत चांगली फलंदाजी केल्याने आणि ऑफ स्पिन गोलंदाजी केल्याने त्याची निवड कायम राहील. (Bumrah Archer)

 इंग्लंडचा संघ : झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोत, जो रुट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोयब बशीर.

संभाव्य भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, के.एल. राहूल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितिश रेड्डी, जसप्रित बुमराह, आकाश दीपक, मोहम्मद सिराज.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00