Home » Blog » अहिल्यादेवींच्या स्मृतीवर बुलडोझर चालवण्याचे भाजप व मोंदींकडून घोर पाप  : हर्षवर्धन सपकाळ

अहिल्यादेवींच्या स्मृतीवर बुलडोझर चालवण्याचे भाजप व मोंदींकडून घोर पाप  : हर्षवर्धन सपकाळ

by प्रतिनिधी
0 comments
Bulldozer at Manikarnika Ghat

जमीर काझी :  मुंबई : सोमनाथाचे मंदिर गजनीच्या मेहमुदने उद्धवस्थ केले.  त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला आहे.  अहिल्यादेवींच्या स्मृती त्यांना पुसून टाकायच्या असल्याने अत्यंत निर्दयी व विकृतपणे घाट व घाटावरील मूर्ती नष्ट करण्यात आल्या आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी  रविवारी केला. 

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना   त्यांनी मणिकर्णिका घाट उद्ध्वस्थ करणाऱ्या भाजपा व नरेंद्र मोदी यांचा तीव्र निषेध करून म्हणाले की, ‘अहिल्यादेवींचा ३०० वा जन्मशताब्दी उत्सव साजरा करण्यासाठी भाजपा सरकार एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करत आहे तर दुसरीकडे मात्र त्यांच्या स्मृती पुसण्याचे पाप करत आहे. हिंदुत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपाचा हा दुटप्पीपणा जनतेनेसमोर उघड झाला आहे.  मोदींच्या अंगात गजनीचे भूत शिरले आहे, असा गंभीर आरोप करून अहिल्यादेवींचा अपमान महाराष्ट्राची जनता कदापी सहन करणार नाही. भाजपा व मोदींच्या या कृतीविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. (Bulldozer at Manikarnika Ghat)

नरेंदर सरेंडर का झाले … पंतप्रधान मोदी यांनी मुंबई काँग्रेसवर केलेल्या टीकेला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की,  मोदी यांनी काँग्रेस पक्षाचा विचार करू नये, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य विजयी पताका फडकवत असताना अमेरिकेच्या दबावाला बळी पडून नरेंदर सरेंडर का झाले, याचे उत्तर त्यांनी द्यावे, मुंबई महानगरपालिकेत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर होत नाही, याचा मोदींना आनंद झाला असावा, असेही सपकाळ म्हणाले. (Bulldozer at Manikarnika Ghat)

आमदार गोपीचंद पडळकर गप्प का? …  ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे म्हणाले की, अहिल्यादेवींनी १७७१ मध्ये वाराणसीत मणिकर्णिका घाट बांधला होता., त्यावर १० जानेवारीला  भाजपा सरकार व नरेंद्र मोदी यांनी बुलडोझर चालवला.  अहिल्यादेवींच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली, हे सर्व धनगर समाजाचा स्वाभिमान दुखवणारे आहे. २७ तारखेपर्यंत मोदींनी जाहीर माफी मागावी अन्यथा भाजपाच्या एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा देऊन धनगर समाजाचा घोर अपमान केल्यानंतरही भाजपा आमदार  गोपीचंद पडळकरसारखे धनगर गप्प का आहेत?, असा सवाल त्यांनी केला. (Bulldozer at Manikarnika Ghat)

झेडपीच्या निवडणुकीत घड्याळाशी आघाडी  नाही..  नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी आघाडी केली त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आघाडी केली जाईल. जेथे आघाडी करणे शक्य आहे तेथे आघाडी केली जाईल परंतु घड्याळाशी आघाडी केली जाणार नाही, असेही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक त्यांच्या  अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे  झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आम्ध्घ्ऱ् विश्वजीत कदम, बी. एम. संदीप,  गणेश पाटील,  मोहन जोशी, महिला  प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह राज्य निवड मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणनितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

वंचितशी आघाडीसंदर्भात  प्रश्नाला उत्तर देताना  सपकाळ म्हणाले की, लातूर व नांदेड महानगरपालिकेत दोन्ही पक्षांनी आघाडी करून योग्य पद्धतीने निवडणुकीला सामोरे गेलो. वंचित बरोबरची आघाडी ही आकड्यांचा खेळ नाही तर विचारांचा मेळ आहे. दोन्ही पक्षामध्ये योग्य समन्वय असून जी टीका केली जात आहे ती एकांगी आहे. (Bulldozer at Manikarnika Ghat)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00