जमीर काझी : मुंबई : मुंबईच्या महापौरांची जबाबदारी वीज, रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधा पुरवण्याची आहे पण त्या सतत बांगलादेशींबद्दल बोलत राहतात. भाजपच्या १२ वर्षांच्या राजवटीनंतरही जर मुंबईत बांगलादेशी असतील, तर तो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोष आहे. दोन्ही गृहमंत्री अपयशी ठरले आहेत, त्यामुळे महापौर रितु तावडे यांनी या दोघांचा राजीनामा मागण्याची हिम्मत दाखवावी, असे आव्हान मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दिले . (Demand the resignations of Shah and Fadnavis)
तावडे यांच्या विधानाचा समाचार घेत त्या म्हणाल्या की,’ १२ वर्षांपासून भाजपाचे सरकार केंद्रात सत्तेत आहे. देश मोदींच्या हातात मजबूत आहे असा दावा भाजपा करते. तर राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आहे. असे असताना बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न येतोच कसा?. हे बांगलादेशी व रोहिंग्या भारतात आलेच कसे?. असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला. (Demand the resignations of Shah and Fadnavis)
वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘अवैध बांग्लादेशी लोक भारतात येतात, चीन आक्रमण करून भारताचा भूभाग बळकावते याचा अर्थ मोदी सरकार काही काम करत नाही. आपल्या सीमा सुरक्षित नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना हा प्रश्न विचारणे संयुक्तिक ठरेल पण महापौर मात्र काँग्रेस पक्षाला दोष देत आहेत. अजून किती दिवस भाजपा स्वतःच्या अपयशाचे खापर काँग्रेस वर फोडणार आहे, अशी विचारणाही त्यांनी केली. (Demand the resignations of Shah and Fadnavis)
जनतेच्या प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठी राहुल गांधी यांच्यावर टीका
एलपीजी गॅस ची देशात टंचाई आहे, लोकांना गॅस सिलेंडर साठी रांगा लावाव्या लागतात. हॉटेल व छोटे व्यवसाय गॅस अभावी बंद पडत आहेत. मुंबईतही छोटे व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. गॅस टंचाई व एपस्टीन फाईल वरून देशातील जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर पातळी सोडून टीका करत आहेत. भाजपाच्या नेत्यांनी राहुल यांना कितीही बदनामीचा प्रयत्न केले तरी काँग्रेसला त्याचा काहीही फरक पडत नाही. जनतेच्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवत राहु. राहुल गांधी यांच्यावर बोलण्याआधी अशा वाचाळवीरांनी आपला इतिहास पहावा. राहुल यांच्यावर बोलण्याची त्यांची लायकी नाही असा टोलाही गायकवाड यांनी लगावला आहे. (Demand the resignations of Shah and Fadnavis)