भागलपूर[M1] : बिहार राज्यातील भागलपूर येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंतद राय यांच्या भाच्याची बंदुकीची गोळी झाडून हत्या करण्यात आली. गोळीबारात नित्यानंद राय यांची बहिणही गंभीर जखमी झाली आहे. बिहारमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. (Bhagalpur firing)
भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया जवळील जगतपूर गावात ही घटना घडली. कुटुंबातील वादातून हा हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांचा भाचा जयजीत यादव आणि विकल यादव यांच्यात एका कारणांवरुन जोरदार वाद झाला. दोघांनी बंदुका बाहेर काढून गोळ्या झाडल्या. त्यामध्ये विकल यादवचा जागेवरच मृत्यू झाला तर जयजीत यादव गंभीर जखमी झाला. नित्यानंद राय यांच्या बहिणीलाही गोळी लागली असून त्याही गंभीर जखमी झाल्या आहेत. (Bhagalpur firing)
गंभीर जखमी असलेल्या आई आणि मुलाला भागलपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. जयजीत यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे. या घटनेवर राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. (Bhagalpur firing)
पोलिसांनी गोळीबार घटनेचा तपास सुरू केला आहे. दोघां भावामध्ये गोळीबार कोणत्या कारणांवरुन झाला याचा पोलिस शोध घेत आहेत. गोळीबारामध्ये आणखी कुणी सहभागी आहेत या याचाही शोध घेतला जात आहे. या घटनेने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक घरातूत बाहेर पडण्यास भीत आहेत. गावात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. (Bhagalpur firing)
हेही वाचा :
सुधा मूर्ती, अजिम प्रेमजी यांची नावे वापरून फसवणूक
दिशा सालियन मृत्यूप्रकरण पाच वर्षांनी पुन्हा चर्चेत