पुणे : कामाच्या तणावातून बँकेच्या मुख्य व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यवस्थापकाने बँकेतच आत्महत्या केली. शिवशंकर मित्रा असे त्यांचे नाव आहे. ते मूळचे प्रयागराज येथील आहेत. (Bank manager suicide)
मित्रा हे बँक ऑफ बडोदाच्या बारामती शाखेत मुख्य व्यवस्थापक पदावर होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी बँकेत बसूनच चिठ्ठी लिहिली. त्यात त्यांनी, कामाच्या तणावातूनच मी आत्महत्या करण्यासारखे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे.
ही घटना गुरुवारी (१७ जुलै) रात्री घडली. एखाद्या बँक अधिकाऱ्याने कार्यालयातच आत्महत्या करण्याची ही या भागातील पहिलीच घटना आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला. तपासादरम्यान त्यांना मित्रा यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली. (Bank manager suicide)
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मित्रा यांनी ११ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. प्रकृती अस्वास्थ्य आणि कामाचा तणाव असल्यामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले होते. तथापि, व्यवस्थापनाने ९० दिवसाच्या नोटीस पीरियडचे कारण देत त्यांना तत्काळ मुक्त केले नव्हते, असे बारामती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास नाळे यांनी स्पष्ट केले. तसेच यामागे अन्य काही कारणे आहेत का, याचाही तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
मोटारीत शीर, हातपाय तोडून मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले
गृह राज्यमंत्र्याच्या आईच्या नावे डान्सबार : परबांचा आरोप