Home » Blog » Rangoli murder :  मोटारीत शीर, हातपाय तोडून मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले

Rangoli murder :  मोटारीत शीर, हातपाय तोडून मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले

by प्रतिनिधी
0 comments
Rangoli murder

कोल्हापूर : प्रतिनिधी : रांगोळी ग्रामपंचायत सदस्य लखन अण्णाप्पा बेनाडे (वय ३२) यांचे अपहरण करुन मोटारीत कोंबले. मोटारीत त्याच्यावर धारधार हत्यारांनी वार करुन खलास केले. त्यानंतर धडापासून शीर, हात पाय वेगळे करुन शरीराचे तुकडे कर्नाटकातील संकेश्वर येथील नदीत फेकून दिले. पोलिसांनी या गुन्ह्यात पाच संशयितांना ताब्यात घेतले असून खून झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्याचे काम सुरू केले आहे. (Rangoli murder)

लक्ष्मी विशाल घस्ते (रा. राजेंद्रनगर), विशाल बाबराव घस्ते, आकाश उर्फ माया दीपक घस्ते (रा. तामगाव, ता. करवीर), संस्कार महादेव सावर्डे (रा. देवाळे, ता. करवीर), अजित उदय चुडेकर (जुना वाशी नाका, कोल्हापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावेत आहेत.

रांगोळी ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे याची लक्ष्मी घस्ते हिच्याशी अडीच वर्षापासून ओळख झाली. त्यानंतर दोघांची जवळीक वाढली आणि ते दोघे इचलकरंजीत भाडयाच्या खोलीत वास्तव्य करत होते. अडीच महिन्यापूर्वी दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्यावर बेनाडेनेने लक्ष्मी घस्तेचा छळ सुरू केला. दोघांनीही एकमेकाविरोधात पोलिसात तक्रारी दिल्या. हा वाद विकोपाला गेला. (Rangoli murder)

ग्रामपंचायत सदस्य बेनाडे याने लक्ष्मी घस्ते यांच्याविरोधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या. लक्ष्मी घस्ते हिचा पूर्वाश्रमीचा पती विशाल घस्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही धमक्या दिल्या होत्या. त्यामुळे घस्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेनाडेचा काटा काढण्याचा कट रचला. १० जुलै रोजी सायबर चौकातून पाठलाग करत शाहू टोल नाक्याजवळ बनाडेचे अपहरण केले आणि त्याला कारमध्ये कोंबले. शाहू टोल नाका ते संकेश्वर मार्गावर कारमध्ये बेनाडेची हत्या केली. त्याचे डोके, दोन्ही हात, पाय, धडापासून वेगळे करण्यात आले. मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरले आणि ते पोते संकेश्वर नदीत फेकून दिले.

असा केला पोलिसांनी तपास

बेनाडे यांची बहिण नीता उमाजी तडाखे यांनी भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार शिवाजीनगर इचलकरंजी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. एलसीबीने समांतर तपास सुरू केला होता. पोलिसांनी विशाल घस्ते व त्याच्या साथीदारांनी बेनाडेचे अपहरण केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घस्ते याला उजळाईवाडी येथे ताब्यात घेतले. सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असताना त्याने खुनाची कबुली दिली. दोन वर्षापूर्वी राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गुन्ह्यामध्ये विशाल घस्ते कळंबा कारागृहात होता. कारागृहात असताना विशालची पत्नी लक्ष्मी घस्ते बचत गटाचे कर्ज मागण्यासाठी बेनाडेकडे गेली होती. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन बेनाडेने तिच्या शरीरसंबध ठेवले आणि तिला घरीच ठेऊन घेतले. शरीर संबधाचे व्हिडिओ करुन ते प्रसारित करण्याची धमकी दिली. तो वारंवार त्रास देत होता. (Rangoli murder)

विशाल कारागृहातून सुटल्यावर लक्ष्मी घस्ते परत विशालकडे आली. त्यानंतर बेनाडे याने लक्ष्मी आणि विशाल घस्ते यांच्या विरोधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या. बेनाडे दहा जुलै रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्यात आला होता. त्यावेळी त्याने विशाल घस्ते आणि त्यांच्या साथीदारांवरील तक्रारी मागे घेतो असे सांगताना लक्ष्मीला माझ्याबरोबर चल असे सांगून तिला बोलावून घेतले. त्यावेळी लक्ष्मीने विशाल गस्तेलाही बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी बेनाडेच्या कारचा पाठलाग सायबर चौकातून सुरू केला. शाहू टोल नाक्याजवळ विशाल घस्तेचे साथीदार आकाश घस्ते, संस्कार सावर्डे, अजित चुडेकर यांनी बेनाडेचे अपहरण करुन कारमध्ये कोंबले आणि त्याची हत्या केली.   

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00