कोल्हापूर : प्रतिनिधी : थकीत कर्जापोटी बँकेकडून होणारी जप्ती कारवाई टाळण्यासाठी एक लाख ७० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बँकेच्या कायदा सल्लागाराला सीबीआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संयुक्तपणे कारवाई करत रंगेहाथ पकडले. इचलकरंजी येथे मंगळवारी १० रोजी रात्री कारवाई करण्यात आली. इंडियन बँकेचा कायदा सल्लागार अड विजय पाटणकर असे लाचखोराचे नाव आहे. कोर्टाने त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (CBI Raid )
सीबीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, इचलकरंजी येथील इंडियन बँकेच्या शाखेकडून तक्रारदाराने साडेपाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज थकीत असल्याने बँकेने तक्रारदाराच्या घरावर जप्तीची कारवाई करण्याची नोटीस बजावली होती. तक्रारदाराने जप्तीची कारवाई पुढे ढकलावी, अशी मागणी बँकेकडे केली होती. बँकेचा कायदा सल्लागार ॲड. पाटणकरने कारवाई पुढे ढकलण्यासाठी अडीच लाख रुपयाची लाच मागितली. तडजोडीअंती लाचेची रक्कम एक लाख ७० अशी ठरवण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि सीबीआयकडे तक्रार केली होती. सीबीआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पाटणकरला एक लाख सत्तर हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. (CBI Raid )
हेही वाचा :
दोघे ग्रामविकास अधिकारी जाळ्यात
जिल्हा न्यायाधीश ‘एसीबी’च्या जाळ्यात